अन् स्वप्न सत्यात उतरलं! प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर; गृहप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 16:01 IST2023-05-13T15:04:09+5:302023-05-13T16:01:23+5:30

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने नुकताच तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

Prajakta gaikwad shared a video of gruhapravesh pooja of her new home | अन् स्वप्न सत्यात उतरलं! प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर; गृहप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल

अन् स्वप्न सत्यात उतरलं! प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर; गृहप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात लोकप्रिय झाली. तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्या मालिकेतही प्राजक्तानं महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. त्यामुळे सोशल मीडियावर वरचेवर तिची चर्चा रंगत असते. आता एक व्हिडीओ पोस्ट करत प्राजक्ताने तिच्या चाहत्यांशी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ते सांगत असते. चाहतेही तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुकत असतात. आपल्या कामाबरोबरच प्राजक्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील चांगलीच प्रगती करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचं घर घेतलं. तर आता त्या घरामध्ये तिने गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा केली. यादरम्यानचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. 

प्राजक्ता तिच्या संपूर्ण कुटुंबासह या घरात राहायला आली आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात प्राजक्ता पूजेचा कलश डोक्याला लावताना दिसतेय. तिचं घर अतिशय सुंदर सजवण्यात आलं आहे. घरात मोठासा लाकडी देव्हाराही आहे. घराचं इंटेरिअरदेखील अतिशय उत्तम आहे. मुख्यतः पांढरा आणि चॉकलेटी अशा रंगांची निवड घर सजवण्यासाठी करण्यात आली आहे. तिच्यावर आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: Prajakta gaikwad shared a video of gruhapravesh pooja of her new home