प्राजक्ता गायकवाडने शेअर केला येसूबाईंच्या गेटअपमधला फोटो, चाहत्यांनी दिली अशी दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 18:51 IST2020-05-01T18:45:40+5:302020-05-01T18:51:36+5:30

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली

Prajakta gaikwad share her throwback photo gda | प्राजक्ता गायकवाडने शेअर केला येसूबाईंच्या गेटअपमधला फोटो, चाहत्यांनी दिली अशी दाद

प्राजक्ता गायकवाडने शेअर केला येसूबाईंच्या गेटअपमधला फोटो, चाहत्यांनी दिली अशी दाद

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. प्राजक्ताच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. प्राजक्ताने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत सोबत प्राजक्ताने अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे.. कुणापुढे वाकणार नाही, मी मराठ्याची जात आहे ।। असे कॅप्शन दिले आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. 

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली.मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारले होते. 


या मालिकेसाठी प्राजक्ताने बरीच मेहनत घेतली  होती.  तिने घोडेस्वारीचं आणि तालवारबाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं होते. प्राजक्ता शालेय, आंतरशालेय एकांकिका, नाटकांमध्ये भाग घ्यायची. प्राजक्ताला बॉलिवूड, हिप-हॉप आणि कथ्थक हे सर्व डान्सचे प्रकार येतात.

Web Title: Prajakta gaikwad share her throwback photo gda