प्राजक्ता गायकवाडने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रात, पतीसह घेतलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:53 IST2026-01-14T15:53:34+5:302026-01-14T15:53:58+5:30
प्राजक्ता पती शंभुराज खुटवड यांच्यासह पहिली मकरसंक्रांत साजरी करण्यासाछी खास घृष्णेश्वर मंदिरात गेली होती. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

प्राजक्ता गायकवाडने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रात, पतीसह घेतलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन
नववर्षातील पहिला सण मकरसंक्रांत सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींची ही पहिलीच मकरसंक्रांत आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेदेखील लग्नानंतरची तिची पहिली मकरसंक्रात साजरी केली. प्राजक्ता पती शंभुराज खुटवड यांच्यासह पहिली मकरसंक्रांत साजरी करण्यासाछी खास घृष्णेश्वर मंदिरात गेली होती. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने गुलाबी साडी नेसल्याचं दिसत आहे. हलव्याचे दागिने घालून प्राजक्ता तयार झाली आहे. प्राजक्ताने पती शंभुराजसह ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत पूजा केली. "पहिली मकरसंक्रांत…आज १२ ज्योतिर्लिंग मध्ये असलेल्या श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतले", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट्स देत असते.
प्राजक्ता हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. प्राजक्ताने तिने 'आई माझी काळूबाई' या मालिकेतही काम केलं आहे. 'लॉकडाऊन लग्न', 'सिंगल' या सिनेमांमध्ये ती दिसली होती. नुकतंच तिचा 'स्मार्ट सुनबाई' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये शंभुराज खुटवड यांच्याशी लग्न करत तिने संसार थाटला.