प्राजक्ता गायकवाडच्या वाढदिवसाला होणाऱ्या नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:39 IST2025-10-06T12:38:46+5:302025-10-06T12:39:34+5:30
प्राजक्ता गायकवाडच्या वाढदिवशी होणाऱ्या नवऱ्याने रोमँटिक पोस्ट शेअर करत तिच्यावरील प्रेम जाहीरपणे व्यक्त केलंय.

प्राजक्ता गायकवाडच्या वाढदिवसाला होणाऱ्या नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, म्हणाला...
Prajakta Gaikwad Birthday: मराठी मनोरंजनसृष्टीत ऐतिहासिक भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) . तिने आतापर्यंत विविध मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ताचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. प्राजक्ता आज ६ ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. प्राजक्तासाठी हा वाढदिवस जास्त स्पेशल आहे. कारण काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा साखरपुडा झाला केला. शंभूराज खुटवडसोबत (Shambhuraj Khutwad) प्राजक्ताची एन्गेजमेंट झाली. आज आपल्या लेडी लव्हच्या वाढदिवसासाठी शंभूराज खुटवडने खास पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, या सर्व शुभेच्छांमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याने केलेली खास पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. प्राजक्ताचा होणारा नवरा शंभूराज खुटवडने इन्स्टाग्रामवर तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोंसोबत शंभूराजने लिहिले, "माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... तू खूप खंबीर आणि चांगली आहेस. तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आहे", या शब्दात त्यानं प्राजक्तावरचं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं. प्राजक्ता गायकवाडनंही त्याची स्टोरी रिशेअर करत "धन्यवाद" (Thank you) असे लिहिले.
केव्हा पार पडणार प्राजक्ता आणि शंभूराज यांचा विवाहसोहळा?
प्राजक्ता आणि शंभूराज खुटवड यांचा साखरपुडा ७ ऑगस्ट २०२५ पुण्यात थाटामाटात पार पडला होता. आता प्राजक्ता आणि शंभूराज यांच्या विवाहची तारीख समोर आली असून लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. तर प्राजक्ता आणि शंभूराज यांचा लग्नसोहळा २ डिसेंबर मंगळवारी, दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी पार पडणार आहे. प्राजक्तानं लग्नपत्रिका पूजनाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आणि नेटकऱ्यांसोबत लग्नाची तारीख शेअर केली आहे. हा विवाहसोहळा पुण्यात पार पडणार असल्याचं म्हटलं जातंय. प्राजक्ताचा होणारा नवरा शंभूराज खुटवड हा उद्योजक आणि पैलवान आहे.