पूजा सावंतचा स्टनिंग लूक पाहून चाहते झाले पडले प्रेमात, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 17:56 IST2021-02-24T17:53:08+5:302021-02-24T17:56:29+5:30

पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

Pooja sawant look stunning in her latest photo | पूजा सावंतचा स्टनिंग लूक पाहून चाहते झाले पडले प्रेमात, फोटो व्हायरल

पूजा सावंतचा स्टनिंग लूक पाहून चाहते झाले पडले प्रेमात, फोटो व्हायरल

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर'मध्ये परीक्षकाची भूमिका साकारते आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते.

पूजाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत ती ग्लॅमरस दिसतेय. व्हाईट आणि ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा स्टनिंंग दिसतेय. या फोटोतील पूजाच्या अदापाहून चाहते फिदा झालेत. पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप उमटविली आहे. पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने महिला माहूताची भूमिका साकारली होती.

Web Title: Pooja sawant look stunning in her latest photo