पूजाचा ग्लॅमर लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 10:40 IST2016-04-14T17:38:23+5:302016-04-14T10:40:56+5:30

बॉलीवूडमध्ये सोनम कपूर, परिणीती चोप्रडा, मलायका अरोरा, कंगना रणावत या तगडया अभिनेत्री अ‍ॅवार्ड,पार्टीज,लग्न सोहळे यामध्ये नेहमी हटके लूकमध्ये दिसतात. ...

Pooja Glamor Look | पूजाचा ग्लॅमर लूक

पूजाचा ग्लॅमर लूक

लीवूडमध्ये सोनम कपूर, परिणीती चोप्रडा, मलायका अरोरा, कंगना रणावत या तगडया अभिनेत्री अ‍ॅवार्ड,पार्टीज,लग्न सोहळे यामध्ये नेहमी हटके लूकमध्ये दिसतात. तसेच त्यांनी परिधान केलेल्या कपडयांची चर्चा देखील बरीच रंगत असते. नुकत्याच पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कारावेळी देखील आघाडीची स्टायलिस्ट खेळाडू सानिया मिर्झा हिने परिधान केलेल्या कॉश्च्युमची चर्चा देखील बरीच रंगली. आता, हेच चित्र मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील दिसू लागले आहे. मराठी इंडस्ट्रीच्या अभिनेत्रीदेखील सुंदर व ग्लॅमरल आउटफीटसमुळे चर्चेत येऊ लागल्या आहेत. नुकतेच पार पडलेल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री पूजा सावंत देखील एकदम ग्लॅमर लूकमध्ये दिसली. फूल हलकसा असा पिंक मिक्स व्हाईट गाउन, त्याच्या हटके कट सिल्वज व पूर्ण नेटटेड गळा या स्टायलिश काश्च्युम मध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. तसेच तिने केलेल्या हेअर स्टाइलने देखील तिच्या सौदर्यात अधिक भर टाकली. पण तिच्या या अशा हटके व ग्लॅमर लूकमुळे  तिने बॉलीवुड अभिनेत्रींची आठवण करून दिली हे नक्की. 

Web Title: Pooja Glamor Look