पेट्रोल पंपावर घातली अंगठी, पूजा-सोहमचं अनोखं प्रपोजल; मुलाखतीत सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:42 IST2026-02-17T14:42:32+5:302026-02-17T14:42:55+5:30

पूजा-सोहमच्या प्रपोजलची फिल्मी गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का?

Pooja Birari Soham Bandekar Proposal Petrol Pump Bandra Story | पेट्रोल पंपावर घातली अंगठी, पूजा-सोहमचं अनोखं प्रपोजल; मुलाखतीत सांगितला किस्सा

पेट्रोल पंपावर घातली अंगठी, पूजा-सोहमचं अनोखं प्रपोजल; मुलाखतीत सांगितला किस्सा

अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर यांचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील तारे तारका उपस्थित होते. २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात शाही थाटात विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि रिसेप्शनचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजले. मात्र, या दोघांच्या साखरपुड्याची गोष्ट अत्यंत फिल्मी आहे.

पूजा आणि सोहमने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एकमेकांसाठी कोणालाही न सांगता गुपचूप अंगठ्या खरेदी केल्या होत्या. विशेष म्हणजे, अंगठी खरेदी केल्यानंतर हे दोघेही त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेले. लग्नाच्या अवघ्या तीन दिवस आधी कपाट आवरताना सोहमला ती अंगठी सापडली आणि मग प्रपोजलचे प्लॅनिंग सुरू झालं.

पूजाने सांगितलेला किस्सा तर अधिकच रंजक आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, "मला खूप मोठं आणि गाजावाजा करणारं प्रपोजल नको होतं. मी सोहमला म्हणाले, "मुलगी मुलाला का प्रपोज करू शकत नाही? आपण ही अंगठी आत्ताच घालून बघूया का? सोहम काही समजण्याच्या आत मी वांद्र्याच्या एका पेट्रोल पंपावर गाडी उभी असतानाच त्याच्या बोटात अंगठी घातली!".

यावर सोहमची रिॲक्शन अत्यंत मजेशीर होती. तो म्हणाला, "काय गं, वांद्र्याच्या पेट्रोल पंपावर तू मला प्रपोज केलंस?". त्यानंतर दोघांनी त्या अंगठ्या पुन्हा बॉक्समध्ये ठेवून दिल्या. मात्र लग्नाच्या दिवशी सोहमने एक अतिशय रोमँटिक सेटअप तयार केला आणि सर्वांसमोर पूजाला अधिकृतपणे प्रपोज करत अंगठी घातली.

Web Title : अभिनेत्री पूजा बिरारी का सोहम बांदेकर को पेट्रोल पंप पर अनोखा प्रस्ताव

Web Summary : पूजा बिरारी और सोहम बांदेकर की फिल्मी सगाई में भूली हुई अंगूठियाँ और एक आश्चर्यजनक पेट्रोल पंप प्रस्ताव शामिल था। पूजा ने अचानक एक पेट्रोल पंप पर प्रस्ताव रखा। बाद में सोहम ने उनकी शादी के दिन एक आधिकारिक प्रस्ताव के लिए एक रोमांटिक सेटअप बनाया।

Web Title : Actress Pooja Birari's Unique Petrol Pump Proposal to Soham Bandekar

Web Summary : Pooja Birari and Soham Bandekar's filmy engagement involved forgotten rings and a surprise petrol pump proposal. Pooja spontaneously proposed at a petrol pump. Soham later created a romantic setup for an official proposal on their wedding day.