​हर मर्द का दर्द या मालिकेत होणार पूजा बॅनर्जीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 17:08 IST2017-04-25T11:38:26+5:302017-04-25T17:08:26+5:30

पूजा बॅनर्जी एक दुसरे से करते है प्यार हम या मालिकेमुळे नावारूपाला आली. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली. काहीच ...

Pooja Banerjee's entry in every series of men's series | ​हर मर्द का दर्द या मालिकेत होणार पूजा बॅनर्जीची एंट्री

​हर मर्द का दर्द या मालिकेत होणार पूजा बॅनर्जीची एंट्री

जा बॅनर्जी एक दुसरे से करते है प्यार हम या मालिकेमुळे नावारूपाला आली. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली. काहीच दिवसांपूर्वी तिने अॅडव्हेंचर्स ऑफ हातिम या मालिकेत काम केले होेत. आता पूजा पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिची लवकरच हर मर्द का दर्द या मालिकेत एंट्री होणार आहे. या मालिकेत ती प्रेक्षकांना एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यामते तिने साकारलेल्या भूमिकांमध्ये ही सगळ्यात चांगली भूमिका असून एक अभिनेत्री म्हणून तिला अभिनय करण्यासाठी या भूमिकेद्वारे चांगलाच वाव मिळणार आहे. या भूमिकेविषयी पूजा सांगते, मला या मालिकेतील भूमिका प्रचंड आवडली. मी या मालिकेत एका खट्याळ मुलीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी माझ्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. सध्या या मालिकेच्या निर्मात्यांसोबत या भूमिकेबाबत माझी चर्चा सुरू असून या मालिकेत माझा लूक कसा असावा याबाबत आम्ही विचार करत आहोत. मी या मालिकेच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणार आहे. या मालिकेत मी एका खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. मी माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशाप्रकारची भूमिका साकारत असून ही भूमिका माझ्या चाहत्यांना आवडेल याची मला खात्री आहे. एक दुसरे से करते है प्यार या मालिकेनंतर मी विनोदी भूमिका साकारलेली नाहीये. खरे तर मला कित्येक दिवसांपासून विनोदी किंवा खलनायिकेची भूमिका साकारण्याची इच्छा होती. या मालिकेतील माझ्या भूमिकेला दोन्ही छटा असल्याने मी खूपच खूश आहे. 
या मालिकेचे दिग्दर्शन परमीत सेठी करत असून यात फैसल रशिद प्रमुख भूमिकेत आहे. 

Web Title: Pooja Banerjee's entry in every series of men's series