​चाहुलला मिळणार रंजक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2017 11:39 AM2017-05-11T11:39:22+5:302017-05-11T17:09:22+5:30

चाहूल या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आता या मालिकेला एक रंजक वळण येणार आहे. या मालिकेत आता ...

Ponytail Loose | ​चाहुलला मिळणार रंजक वळण

​चाहुलला मिळणार रंजक वळण

googlenewsNext
हूल या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आता या मालिकेला एक रंजक वळण येणार आहे. या मालिकेत आता सर्जा म्हणजेच अक्षर कोठारी एका द्विधा मनस्थितीमध्ये अडकणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 
चाहुल या मालिकेत वाड्यातील भूत कोण आहे हे सत्य सगळ्यांना कळणार हे निर्मलाला कळल्यावर निर्मलाने आपली खेळी रचायला सुरुवात केली आहे आणि शांभवी निर्मलाच्या या जाळ्यात पूर्णपणे अडकली गेली आहे. यामुळे वाड्यामध्ये कोणाचा खून झाला आहे हा शोध पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे शांभवी निर्मलाच्या खुनाचे सत्य सर्जाला सांगू शकली नाही. पण हे सगळे होत असतानाच सर्जा नकळतच हळूहळू शांभवीच्या प्रेमात पडत चालला आहे. शांभवी वाड्यात ज्याप्रकारे वावरते, ज्याप्रमाणे ती सगळ्यांना मदत करते. तसेच सर्जाच्या आईला जेवण करण्यात मदत करते या सगळ्या गोष्टी पाहून सर्जाच्या मनात शांभवीविषयी प्रेमाची भावना निर्माण होऊ लागली आहे. पण आपण शांभवीवर प्रेम करू लागलो आहोत याची चाहुल सर्जाला अजूनही लागलेली नाही. पण सर्जाच्या आधी याची चाहूल निर्मलाला लागली आहे. त्यामुळे निर्मला आता नवीन काहीतरी करणार यात काही शंकाच नाही. पण सर्जाला याची चाहुल कधी लागणार यासाठी आपल्याला काही काळ तरी वाट पाहावी लागणार आहे.
सर्जा गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या बालमैत्रिणीचा म्हणजेच निर्मलाचा शोध घेत आहे. तिचा अजूनही पत्ता लागलेला नाही. त्यात निर्मलाने बबन्याला देखील मारून टाकले आहे. या सगळ्यामुळे मालिकेच्या कथानकातील गुंतागुंत वाढत चालली आहे.   

Web Title: Ponytail Loose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.