​झी युवावरील अंजलीच्या फॅन्सना मिळणार हा सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 11:53 IST2018-04-30T06:23:25+5:302018-04-30T11:53:25+5:30

झी युवावरील अंजली ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेतील अंजली, असीम, यश यांसारख्या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलाशा ...

A pleasant push to get Anjali's Fansna from Zee Youth | ​झी युवावरील अंजलीच्या फॅन्सना मिळणार हा सुखद धक्का

​झी युवावरील अंजलीच्या फॅन्सना मिळणार हा सुखद धक्का

युवावरील अंजली ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेतील अंजली, असीम, यश यांसारख्या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलाशा वाटायला लागल्या आहेत. अजंली ही मालिका एक तरुण आणि हुशार डॉक्टर अंजली आणि तिच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाभोवती फिरते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली डॉ. अंजली आणि या मालिकेच्या लक्षवेधक कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या मालिकेच्या कथानकात डॉ असीम बेपत्ता झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. अंजलीवर डॉ. यशचे एकतर्फी प्रेम असल्यामुळे असीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात असल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे. पण यश सर्वांना समजवायचा प्रयत्न करतो आहे. पण त्याचे प्रयत्न वाया जात असून त्यानेच हे कृत्य केले असल्याचे सगळ्यांना वाटत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असिमला शोधण्याचे यश ठरवतो. तो त्याला जवळच्या जंगलात शोधतो आणि त्याच वेळी एका अनोळखी नंबर वरून त्याला असिमचा फोन येतो. आश्चर्यचकित झालेला यश त्या नंबरला ट्रेस करून असिमला शोधून काढतो आणि त्याला घरी घेऊन येतो. असिमच्या परत येण्यामुळे घरातील सर्वजण आनंदी होतात. अंजलीला तर आनंद अनावर होतो आणि ती त्याला तिला सोडून परत असा कुठे पुन्हा जाऊ नकोस असे त्याला सांगते. असीम मात्र थोडा बदलल्यासारखा वागतोय, छोट्या छोट्या गोष्टींवरून तो अंजलीवर चिडचिड करतोय, अंजली त्याला नक्की काय झाले आहे हे विचारल्यावर तो बोलणं टाळतोय. अंजलीला त्याच्या वागण्यातील हा विचित्र बदल जाणवत असून असिमची ही दुसरी बाजू पाहून तिला धक्का बसतो. त्याच्या वागणुकीतील हा बदल पाहून अंजलीला वाईट वाटते आणि यामागचे कारण शोधायचे ती ठरवते.    
असिम बेपत्ता झाल्यानंतर काय घडले हे अंजली शोधून काढू शकेल का? या मागचे रहस्य काय आहे हे शोधून काढण्यात अंजली यशस्वी होईल का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना अंजली या मालिकेच्या आगामी भागांमध्येच मिळणार आहेत.
अंजली या मालिकेत सुरुची अडारकर, हर्षद आतकरी आणि पियुष रानडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

Also Read : अंजली फेम सुरुची अडारकरने तिच्या चाहत्यांना दिला हा सल्ला

Web Title: A pleasant push to get Anjali's Fansna from Zee Youth