खेलो दांडिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 17:25 IST2016-10-05T11:55:13+5:302016-10-05T17:25:13+5:30

वारिस या मालिकेतील अक्षय डोगराला नवरात्री हा सण खूप आवडतो. या सणाला बनवले जाणारे जेवण तर त्याला खूपच प्रिय ...

Play Dandiya ... | खेलो दांडिया...

खेलो दांडिया...

रिस या मालिकेतील अक्षय डोगराला नवरात्री हा सण खूप आवडतो. या सणाला बनवले जाणारे जेवण तर त्याला खूपच प्रिय आहे. अक्षय नवरात्री नेहमीच आपल्या कुटुंबियांसोबत आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत साजरा करतो. तसेच त्याला दांडिया खेळायलाही खूप आवडतो. यंदाचा नवरात्री तर त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे. त्याच्या मुलाचा हा पहिला नवरात्री आहे. त्यामुळे तो त्याच्या मुलाला घेऊन दांडिया पाहाण्यासाठी जाणार आहे. याविषयी तो सांगतो, "दांडिया खेळण्यासाठी मी वर्षभर नवरात्री या सणाची वाट पाहात असतो. यावर्षी दांडिया पाहिल्यानंतर माझा मुलगा कशी प्रतिक्रिया देतो हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नवरात्रीच्या दिवसांत गुजरातमधील वातावरण तर खूपच छान असते. या दिवसांत या शहरातील लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारलेली असते असे मला वाटते. दांडिया खेळताना काय पो छे या चित्रपटातील गाण्यावर बेफाम नृत्य करायला मला अधिक आवडते." 

Web Title: Play Dandiya ...