‘तुला पाहते रे’ मालिकेतील 'ही' व्यक्ती आहे दिग्गज खलनायक निळू फुले यांची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 06:30 IST2018-10-03T10:21:34+5:302018-10-04T06:30:00+5:30

'तुला पाहते रे' मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे 'गार्गी फुले-थत्ते'. गार्गी फुले या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत.

The person who sees you in the series of 'Tula Pahte Re' is the daughter of veteran actor Nilu Phule | ‘तुला पाहते रे’ मालिकेतील 'ही' व्यक्ती आहे दिग्गज खलनायक निळू फुले यांची मुलगी

‘तुला पाहते रे’ मालिकेतील 'ही' व्यक्ती आहे दिग्गज खलनायक निळू फुले यांची मुलगी

ठळक मुद्दे ईशाच्या आईची भूमिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पडली गार्गीने 'तुला पाहते रे' पूर्वी देखील काही मालिकांमध्ये काम केले आहे

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आणि टी.आर.पी.चे उच्चांक देखील गाठले. अभिनेता सुबोध भावेने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय तसेच नवोदित अभिनेत्री गायत्री दातारसह त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचेही भरपूर प्रेम मिळतंय. 'विक्रांत' आणि 'ईशा' यांच्या भूमिकांभोवती जरी या मालिकेची कथा फिरत असली, तरी ईशाची आई सौ. निमकर यांचीही भूमिका तेवढ्याच ताकदीची आहे. मात्र, ईशाच्या आईची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री कोण आहे माहिती आहे का?

'तुला पाहते रे' मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे 'गार्गी फुले-थत्ते'. गार्गी फुले या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. गार्गीने 'तुला पाहते रे' पूर्वी देखील काही मालिकांमध्ये काम केले आहे. झी मराठी वरील 'तुला पाहते रे' मालिकेतील सौ. निमकरांची म्हणजेच ईशाच्या आईची भूमिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पडली. 'तुला पाहते रे' या मालिकेत गार्गी फुले-थत्ते म्हणजेच ईशाची आई चाळीत राहणार्‍या, एका मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका साकारत आहे. आपल्या नशिबी आलेले दारिद्र आणि तडजोड मुलीच्या आयुष्यात येऊ नये म्हणून तिच्यासाठी श्रीमंत वर शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच तीने ईशाला बिपीन टिल्लूशी लग्न करण्याची गळ घातली आहे पण विक्रांतला टिल्लू परिवाराचं खरं रूप आणि त्यांचं ईशाची लग्न करण्यामागचं कारण कळलं आहे. त्यामुळे आता हे लग्न होणार कि नाही? विक्रांत टिल्लूच खरं रूप सगळ्यांसमोर कसं आणणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: The person who sees you in the series of 'Tula Pahte Re' is the daughter of veteran actor Nilu Phule