‘पवित्र रिश्ता’ तुटला? रित्विक धनजानी-आशा नेगीचे ब्रेकअप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:47 IST2020-04-16T16:45:37+5:302020-04-16T16:47:05+5:30
सहा वर्षांचे नाते तुटले!!

‘पवित्र रिश्ता’ तुटला? रित्विक धनजानी-आशा नेगीचे ब्रेकअप?
टीव्ही इंडस्ट्रीचे लोकप्रिय कपल रित्विक धनजानी आणि आशा नेगी यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, हे कपल गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. पण आता हे त्याने संपल्याची चर्चा आहे.
टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने सर्वांची मने जिंकली होती. या मालिकेतील अंकिता लोखंडे व सुशांत सिंग राजपूत प्रचंड लोकप्रिय झाली होती. सोबतच रित्विक व आशा यांची जोडीही गाजली होती. ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवरच रित्विक व आशा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून हे कपल एकमेकांसोबत होते. मात्र आता या नात्यात बिनसल्याचे कळतेय.
टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलची बातमी दिली आहे. रित्विक व आशा एकमेकांपासून वेगळे झाले असून त्यांच्या जवळच्या मित्रांना हे माहित असल्याचे यात म्हटले आहे. सूत्रांचे मानाल तर गेल्या महिनाभरापासून रित्विक व आशा वेगवेगळे राहत आहेत. आधी हे दोघेही एकत्र राहत. अर्थात अद्याप रित्विक व आशा या दोघांपैकी कुणीही यावर खुलासा केलेला नाही. आशा ही रित्विकच्या कुटुंबाच्याही अतिशय क्लोज आहे. दोघेही टीव्ही इंडस्ट्रीचे लोकप्रिय कपल मानले जात होते. अशात दोघांत खरोखर ब्रेकअप झाले असले तर त्यांच्या चाहत्यांसाठी ही शॉकिंग बातमी आहे.
2019 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी हे कपल लग्न करणार असल्याची चर्चा होती. अर्थात त्यावेळी दोघांनीही याचा इन्कार केला होता. आम्ही दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहोत. पण अद्याप आमचा लग्नाचा विचार नाही, असे रित्विकने स्पष्ट केले होते.
2013 साली रित्विक व आशा यांनी रिलेशनशिपची कबुली दिली होती. यानंतर ही जोडी नच बलिऐ या डान्स रिअॅलिटी शोच्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती.