पवित्रा पुनियाला पूर्व पती म्हणाला- अजून घटस्फोट झालेला नाही, झाल्यावर एजाज खानसोबत रहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 17:35 IST2020-11-30T17:22:32+5:302020-11-30T17:35:26+5:30
पवित्रा पुनिया पर्सनल लाईफला घेऊन सतत चर्चेत असते.

पवित्रा पुनियाला पूर्व पती म्हणाला- अजून घटस्फोट झालेला नाही, झाल्यावर एजाज खानसोबत रहा
पवित्र पुनिया आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. पण ती पर्सनल लाईफला घेऊन सतत चर्चेत असते. 'बिग बॉस 14' मध्ये पवित्र आणि एजाज खानमध्ये जवळीक वाढली होती आणि दोघांचा रोमान्स देखील पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात सुरु झालेले पवित्रा आणि एजाजचं नातं किती दिवसं टिकतं हे वेळचं आपल्याला सांगेल. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार पवित्राचा पूर्व पती सुमित माहेश्वरी याने धक्कादायक खुलासे केले आहेत.
एका मुलाखती दरम्यान सुमित माहेश्वरीने असा दावा केला की, त्याचा आणि पवित्र पुनियाचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. पण लग्नानंतर पवित्राने त्याचा ४ वेळा विश्वासघात केला आहे.
लग्नानंतरही या लोकांसोबत होती पवित्रा रिलेशनशीपमध्ये
सुमित म्हणाला की, लग्नानंतरही पवित्रचे पारस छाबडा, प्रतीक सहजपाल आणि दुसरी एका व्यक्तीसोबत अफेअर होते. पण त्याने प्रत्येक वेळी पवित्राला माफ केले.
सुमित माहेश्वरीने दावा केला की, शोमध्ये पवित्राने एजाज खानचा वापर करुन घेतला. सुमित म्हणतो पवित्राचा मनं चांगलं आहे पण तिच्या सवयींमुळे त्याच्या कुटुंबालाही अनेकदा दु:खी व्हाव लागलं आहे. तो पुढे म्हणाले की, घटस्फोट घेतल्यानंतर पवित्र एजाज खानसोबतचं तिचं रिलेशनशीप सुरु ठेऊ शकते.