"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 10:50 IST2025-10-17T10:49:54+5:302025-10-17T10:50:13+5:30
पार्थच्या एका पोस्टमुळे चाहते चिंतेत पडले आहेत.

"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
टीव्ही अभिनेता पार्थ समथान काही दिवसांपूर्वी 'सीआयडी २'मध्ये दिसला होता. एसीपी प्रद्युम्न यांची त्याने जागा घेतल्यावरुन त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र काही एपिसोड्सनंतर त्याचा 'सीआयडी'मधील प्रवास संपला. हँडसम पार्थ समथान 'कैसी ये यारियां' या मालिकेमुळे तरुणाईंमध्ये लोकप्रिय झाला.'कसौटी जिंदगी की २' मालिकेमुळे त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली. आता पार्थच्या एका पोस्टमुळे चाहते चिंतेत पडले आहेत.
पार्थ समथान आयुष्यात कठीण प्रसंगातून जात आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, "मी काही महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर सक्रीय नाही..हो..असा एक काळ येतो जेव्हा तुम्हाला अगदीच निराश वाटतं..काहीच करावंसं वाटत नाही...पण हा नक्कीच शेवट नाही. नाव लक्षात ठेवा."
पार्थने २५ सप्टेंबर रोजी शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. आता त्याची अशी पोस्ट पाहून चाहते काळजीत आहेत. पार्थला नक्की काय झालंय हे अजून स्पष्ट नाही. मात्र तो लवकरच यातून बाहेर पडेल आणि पुन्हा जोमाने कामाला लागेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली आहे.
पार्थ समथानच्या करिअरबद्दल सांगायचं तर त्याने २०१२ मध्ये अभिनयात पदार्पण केलं. 'ये है आशिकी','कैसी ये यारियां','प्यार तूने क्या किया' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमध्ये काम केलं. 'सीआयडी २'मध्ये त्याला संधी मिळाली. जूनमध्ये त्याचा मालिकेतला प्रवास संपला. तसंच पार्थने रवीना टंडनच्या 'घुडचढी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.