"जिथे देव, तिथे सैतानही..." शेफाली जरीवालीचा मृत्यू काळ्या जादूमुळे झाला? पराग त्यागीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:19 IST2026-01-18T15:18:52+5:302026-01-18T15:19:31+5:30

शेफालीचा पती पराग त्यागीने एक पॉडकास्टमध्ये धक्कादायक दावा केला आहे. त्यानं आपल्या बायकोवर काळी जादू केली असल्याचा दावा केला आहे.

Parag Tyagi Claimed His Wife Shefali Jariwala Died By Black Magic | "जिथे देव, तिथे सैतानही..." शेफाली जरीवालीचा मृत्यू काळ्या जादूमुळे झाला? पराग त्यागीचा दावा

"जिथे देव, तिथे सैतानही..." शेफाली जरीवालीचा मृत्यू काळ्या जादूमुळे झाला? पराग त्यागीचा दावा

Parag Tyagi : 'बिग बॉस १३' आणि 'कांटा लगा गर्ल' गाण्याने देशभरात रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली शेफाली जरीवाला हिचे २७ जून रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या फक्त ४२ व्या वर्षी तिचा अचानक मृत्यू झाला.  अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचे कुटुंबीय अजूनही त्या दु: खातून सावरलेले नाहीत. त्याबरोबर तिचा पती पराग त्यागी तर पूर्णपणे खचला आहे. पराग सोशल मीडियावर शेफालीच्या आठवणीत पोस्ट करत असतो. अशातच पराग त्यागीने शेफालीच्या मृत्यूबद्दल दिलेल्या एका मुलाखतीने तो चर्चेत आला आहे. 

पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये बोलताना पराग त्यागी म्हणाला, "अनेक लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, पण माझा यावर ठाम विश्वास आहे. लोकांना स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखाचे जास्त दुःख होते. मला असं वाटत नाही, तर मला माहितेय आहे की शेफालीवर कोणीतरी काळी जादू केली होती. मी त्या व्यक्तीचे नाव घेऊ शकत नाही, पण हे षडयंत्र होते".

परागने या मुलाखतीत काही धक्कादायक अनुभव शेअर केले. तो म्हणाला, "शेफाली मुळात खूप आनंदी मुलगी होती, पण काही काळापासून तिच्या वागण्यात बदल झाला होता. जेव्हा मी भक्तीमध्ये बसायचो, तेव्हा मला काहीतरी अघटित घडत असल्याचे जाणवायचे. तिला केवळ स्पर्श केल्याने मला काहीतरी चुकीचे असल्याचे कळायचे. यावेळी नकारात्मक शक्ती इतकी प्रबळ आणि आक्रमक होती की मी पूजा करुनही तिला वाचवू शकलो नाही".परागच्या मते, त्यांच्या आयुष्यात असा प्रकार पहिल्यांदाच घडला नव्हता. "हे आमच्यासोबत दोनदा घडले आहे. पहिल्यांदा आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडलो, पण यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली होती", असे त्याने सांगितले.


शेफालीच्या मृत्यूनंतर परागने आपले आयुष्य तिच्या स्मृतीसाठी समर्पित केले आहे. त्याने तिच्या आठवणीत युट्यूब चॅनेल आणि पॉडकास्ट सुरू केले आहे. "लोक भावनांशी खेळतात. आजच्या काळात पालकांचे आणि भावंडांचे कौतुक केले जात नाही. माझी पत्नी जाताना काहीच घेऊन गेली नाही, ती फक्त ट्रॅक पँट आणि शर्ट घालून गेली. जे लोक वाईट करतात, त्यांचे कर्म त्यांना सोडणार नाही", अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला.

Web Title : क्या शेफाली जरीवाला की मौत काले जादू से हुई? पराग त्यागी का दावा

Web Summary : पराग त्यागी का दावा है कि उनकी पत्नी, शेफाली जरीवाला, काले जादू का शिकार थीं। उन्होंने उसके व्यवहार में बदलाव देखा और नकारात्मक ऊर्जा महसूस की। उनका मानना है कि ईर्ष्या के कारण किसी ने जादू टोना किया, और यह पहला मामला नहीं था।

Web Title : Shefali Jariwala's death due to black magic? Parag Tyagi's claim.

Web Summary : Parag Tyagi claims his wife, Shefali Jariwala, was a victim of black magic. He noticed changes in her behavior and felt a negative energy, despite his prayers. He believes someone cast a spell due to jealousy and that it was not the first instance.