...आणि पराग कान्हेरे पुन्हा परतला, कुठे आणि कधी ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 10:58 IST2019-08-02T10:51:10+5:302019-08-02T10:58:58+5:30

'बिग बॉस मराठी' सीझन २ मधील स्पर्धक पराग कान्हेरे वेगवेगळ्या कारंणामुळे चर्चेत राहिली.

Parag kanhere starting new cookery show | ...आणि पराग कान्हेरे पुन्हा परतला, कुठे आणि कधी ते वाचा!

...आणि पराग कान्हेरे पुन्हा परतला, कुठे आणि कधी ते वाचा!

'बिग बॉस मराठी' सीझन २ मधील स्पर्धक पराग कान्हेरे वेगवेगळ्या कारंणामुळे चर्चेत राहिली.एका टास्क दरम्यान परागने नेहाच्या कानाखाली मारली आणि माधव देवचक्के, वैशाली माडे व अभिजीत केळकर यांच्यासोबतही त्याची मारामारी झाली. त्यामुळे त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर पराग पुन्हा घरात परतणार अशी चर्चा रंगली होती.

परागनेही त्याच्या सोशल मीडियावरुन मी येणार अशी पोस्ट टाकून उत्सुकता आणखी वाढवली होती. मात्र पराग बिग बॉसच्या घरात परत येत नसून तो  'कूक विथ पराग कान्हेरे' नावाची किचन सिरीज घेऊन आपल्या भेटीला येतो आहे. सोशल मीडियावर  पोस्ट शेअर करुन परागने ही माहिती दिली. परागने लिहीले आहे की, मी येणार... सगळ्यांबद्दल बोलणार... असं काही दिवसांपूर्वी मी पोस्ट केलं आणि त्याचा सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावला... असो... मी येणार म्हणता म्हणता तो दिवस येऊन ठेपलाय... मी येतोय माझ्या किचनसूत्रा या चॅनेलवर एक अनोखी सिरीज घेऊन...  


 परागचे बिग बॉसच्या घरातील रुपाली भोसले सोबतची अफेअरची चर्चा रंगली. 'अनसीन अनदेखा'च्‍या  क्लिपमध्‍ये  फॉलोअर्ससमोर पराग बोलला होता की ''रूपालीच्‍या तरूण मित्रांना, तिच्‍या फॉलोअर्सना, फॅन्‍सना आणि तिच्‍या मागे लागलेल्‍या प्रत्येकाला मला एक संदेश द्यायचा आहे की, प्रयत्‍न सुरू ठेवा, बट शी इज माइन, शी इन ओन्‍ली माइन!...'' पराग हे सगळे रूपाली भोसलेच्या समोरच बोलत होता त्यावेळी रूपाली म्हणाली होती आहे की, ''यस, बट अ‍ॅज ए वेरी गुड फ्रेण्‍ड!''  

Web Title: Parag kanhere starting new cookery show