"तुम्ही कायम आठवणीत राहाल...", पंकज धीर यांच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णींची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:29 IST2025-10-15T17:28:55+5:302025-10-15T17:29:26+5:30
Pankaj Dheer Death: पंकज धीर यांच्या अचानक निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी पंकज धीर यांना पोस्टमधून श्रद्धांजली वाहिली आहे.

"तुम्ही कायम आठवणीत राहाल...", पंकज धीर यांच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णींची भावुक पोस्ट
Pankaj Dheer Death: प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली. पंकज धीर यांच्या अचानक निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी पंकज धीर यांना पोस्टमधून श्रद्धांजली वाहिली आहे.
मृणाल कुलकर्णींनी पंकज धीर यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. "पंकजजी भावपूर्ण श्रद्धांजली... तुम्ही कायमच तुमच्या व्यक्तिरेखांसाठी आणि प्रेमळ, मनमेळाऊ स्वभावासाठी लक्षात राहाल... ओम शांती", असं म्हणत मृणाल कुलकर्णींनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही पंकज धीर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
पंकज धीर यांच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. लोकप्रिय मालिका 'महाभारत'मधील 'कर्ण'च्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर 'चंद्रकांता' या मालिकेत त्यांच्या 'शिवदत्त' या भूमिकेचीही खूप प्रशंसा झाली. 'बढो बहू', 'युग', 'द ग्रेट मराठा' आणि 'अजूनी' यांसारख्या मालिकेतही त्यांनी काम केले होते. याशिवाय, 'सोल्जर', 'तुमको ना भूल पाएंगे', 'रिश्ते', 'अंदाज', 'सड़क' आणि 'बादशाह' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.