पल्लवी वैद्य दिसणार वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 20:30 IST2019-04-09T20:30:00+5:302019-04-09T20:30:00+5:30

ऐतिहासिक कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळं छोट्या पडद्यावरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलंय.

Pallavi vaidya will seen in different role | पल्लवी वैद्य दिसणार वेगळ्या भूमिकेत

पल्लवी वैद्य दिसणार वेगळ्या भूमिकेत

ठळक मुद्देअभिनेत्री पल्लवी वैद्य हिनं पुतळाबाईंच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाहिच पल्लवी आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे

ऐतिहासिक कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळं छोट्या पडद्यावरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलंय. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय. अभिनेत्री पल्लवी वैद्य हिनं पुतळाबाईंच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला. पण हिच पल्लवी आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पल्लवी आता कॉमेडी करणार आहे. थक्क झालात ना? पण हे खरं आहे.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  लवकरच चला हवा येऊ दे च्या मंचावर झी मराठीवरील लाडके कलाकार कॉमेडी करणार आहेत. पुतळाबाईसारखी ऐतिहासिक भूमिका साकारलेली पल्लवी आता थुकरटवाडीत येऊन कॉमेडी करून प्रेक्षकांना किती मनोरंजित करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

लवकरच प्रेक्षकांना या पर्वात पल्लवीला पाहता येईल. पल्लवीच्या कॉमेडीची झलक प्रेक्षकांनी 'चला हवा येऊ द्या'च्या सोमवारच्या भागात पाहिली. तिचा कॉमेडी कारण्याबद्दलचा अनुभव सांगताना पल्लवी म्हणाली, "मी या आधी कधीच विनोदी भूमिका केली नाही आहे. हि माझी पहिलीच वेळ आहे कॉमेडी करायचा आणि मला नक्कीच उत्सुकता आहे या सिझनची."

Web Title: Pallavi vaidya will seen in different role