स्वाभिमान मालिकेत थाटात पार पडला पल्लवी आणि शांतनूचा विवाह, मोठ्या आईच्या मनात नवं कटकारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:23 IST2022-06-07T15:50:10+5:302022-06-07T16:23:31+5:30

Swabhiman : गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय.

Pallavi and Shantanu get married in Swabhiman serial | स्वाभिमान मालिकेत थाटात पार पडला पल्लवी आणि शांतनूचा विवाह, मोठ्या आईच्या मनात नवं कटकारस्थान

स्वाभिमान मालिकेत थाटात पार पडला पल्लवी आणि शांतनूचा विवाह, मोठ्या आईच्या मनात नवं कटकारस्थान

छोट्या पडद्यावरील मालिका स्वाभिमानने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. स्वाभिमान मालिकेमध्ये सध्या रंजक घटना घडामोडी घडताना दिसतात. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. 

सध्या मालिकेत पल्लवी आणि शांतनूच्या लग्नाची धामधूम. पल्लवी आणि शांतनूने संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने सप्तपदी घेतल्या. लग्नातल्या दोघांच्या पारंपरिक लूकला विशेष पसंती मिळत आहे. पल्लवी- शांतनूच्या आयुष्यात जरी आनंदाचे क्षण आले असले तरी मोठ्या आईच्या मनात मात्र नवं कटकारस्थान सुरू आहे. सहा महिन्यांच्या आत पल्लवीचे सूर्यवंशी घराण्यासोबत असलेले संबंध तोडायला लावण्याची शपथ मोठ्या आईने घेतली आहे. त्यामुळे स्वाभिमान मालिकेचे यापुढील भाग उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही. 

स्वाभिमान या मालिकेमधील पल्लवी ही भूमिका अभिनेत्री पूजा बिरारी ही साकारते. तर शांतनू ही भूमिका अभिनेता  अक्षर कोठारी हा साकारतो. पल्लवी आणि शांतनूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे. अभिनेत्री दिशा परदेशी ही निहारीका ही भूमिका साकारते.

Web Title: Pallavi and Shantanu get married in Swabhiman serial