तलाक...तलाक...तलाक! युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीसोबतचं नातं तोडलं, प्रेग्नंसीमध्ये दिलेला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:58 IST2026-03-10T17:58:05+5:302026-03-10T17:58:56+5:30
भर पॉडकास्टमध्ये त्याने पत्नीला घटस्फोट देण्याची घोषणा केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

तलाक...तलाक...तलाक! युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीसोबतचं नातं तोडलं, प्रेग्नंसीमध्ये दिलेला धोका
रजब बट्ट हा लोकप्रिय पाकिस्तानी युट्यूबर आहे. पाकिस्तानमधल्या सगळ्यात श्रीमंत युट्यूबरच्या यादीत त्याचं नाव येतं. पण, सध्या मात्र रजब हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. भर पॉडकास्टमध्ये त्याने पत्नीला घटस्फोट देण्याची घोषणा केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
रेहान तरीकच्या पॉडकास्टमध्ये रजबने पत्नीला घटस्फोट दिला आहे. पत्नी आणि सासरच्या लोकांवर रजबने अनेक आरोपही केले आहेत. तो म्हणाला, "मी हे लग्न इथेच संपवतोय. मला आता खोट्या आणि दिखाव्याच्या नात्यात राहायचं नाही. मला मुलगा आहे. आणि माझ्या संपत्तीवर त्याचा पूर्ण अधिकार असेल. माझ्या पत्नीने माझ्या आईला परफ्युम चोर म्हटलं. माझी सासू आणि मेव्हणाही माझ्या आईवडिलांबद्दल बोलला आहे. मला आता या नात्याला आणखी संधी द्यायची नाही. माझ्या लग्नाला दीड वर्ष झालं. पण माझी पत्नी फक्त काहीच महिने माझ्यासोबत राहिली".
प्रेग्नंसीमध्ये पत्नीला धोका दिल्याची कबुलीही रजतने या पॉडकास्टमध्ये दिली आहे. "माझं एक रिलेशनशिप होतं. जे मला सहजासहजी संपवता आलं नाही. मी मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली. मी पत्नीला याबाबत माफीही मागितली आहे. पण अनेक वेळा मला त्याच गोष्टीवरुन बोललं जातं. जे चुकीचं आहे", असं तो म्हणाला.