प्रसिद्ध अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत; पोटच्या लेकीचा मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:10 IST2025-07-10T13:04:58+5:302025-07-10T13:10:05+5:30
अत्यंत वेदनादायी! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार; म्हणाले-"आमचा तिच्याशी काही संबध नाही..."

प्रसिद्ध अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत; पोटच्या लेकीचा मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार, नेमकं प्रकरण काय?
Humaria Ashgar Ali Death: पाकिस्तानी अभिनेत्री, मॉडल हुमैरा असगरचा कराची येथील राहत्या घरात मृत्यू झाला. जवळपास २ आठवड्यांपूर्वीच तिच्या मृत्यू झाल्याचं तपासात आढळून आलं आहे. शिवाय अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. ८ जुलैच्या दिवशी पोलिसांना हुमैराचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. अभिनेत्रीच्या मृत्यूने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. परंतु, आता मृत्यूनंतर पोलिसांनी हुमैराच्या मृतदेह त्यांनी ताब्यात घेण्यासाठी कुटुंबाशी संपर्क साधला. मात्र, अभिनेत्रीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हुमैरा असगरचे वडील आणि भावाने तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांना पोलिसांना सांगितलं की, "तिच्याशी आमचा काहीही संबध नाही. आम्ही तिच्याशी असलेले सर्व संबंध खूप आधीच तोडले आहेत. त्यामुळे तिच्या मृतदेहाचं तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. आम्ही तिचा मृतदेह घेणार नाही."असं म्हणत तिच्या कुटुंबियांनी त्यांची जबाबदारी नाकारली.
दरम्यान, अभिनेत्री हुमैरा असगरच्या कुटुंबीयांच्या वागणूकीवर पाकिस्तानातील अनेक कलाकारांनी निषेध केला आहे. हुमैराच्या वडिलांनी लेकीची डेड बॉडी घेण्यास नकार दिल्याने पाक अभिनेत्री मंशा पाशाने सोशल मीडियावर पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'हे खूपच भयानक आहे. पालकांचं कर्तव्य आहे की कितीही मतभेद असले तरी त्यांनी काही गोष्टींना मागे सारुन सगळं विसरायला हवं.
हुमायरा असघर ही पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असून ती ‘तमाशा घर’ मालिकेत दिसली होती. याशिवाय मॉडेलिंग क्षेत्रातही तिचं मोठं नाव होतं.