या कारणामुळे पाहिले न मी तुला मालिकेतून गायब होता आशय कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 13:36 IST2021-05-05T13:35:44+5:302021-05-05T13:36:44+5:30
आशय आता मालिकेत लवकरच परतणार असून त्याने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे.

या कारणामुळे पाहिले न मी तुला मालिकेतून गायब होता आशय कुलकर्णी
पाहिले न मी तुला ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत अनिकेतच्या भूमिकेत आपल्याला आशय कुलकर्णीला पाहायला मिळते. पण तो गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेतून गायब असल्याने तो परतणार कधी याची वाट त्याचे चाहते पाहात आहेत.
आशय आता मालिकेत लवकरच परतणार असून त्याने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. आशयला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण आता त्याची तब्येत सुधारली असून त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात सध्या चित्रीकरण करण्यास बंदी असल्याने मराठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या बाहेर सुरू आहे. पाहिले न मी तुला या मालिकेचे चित्रीकरण सध्या गोव्यात सुरू असून आशय काहीच दिवसांपूर्वी गोव्याला पोहोचला आहे. अनिकेत गायब असल्याने मानसी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चिंतेत आहे. पण आता तो परतल्यावर त्या दोघांचे लग्न झाले असल्याचे ते सगळ्यांना सांगणार आहेत. त्यानंतर मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे.