तारक मेहता का उल्टा चष्मामधील दया म्हणजेच दिशा वाकानीच्या ओटीभरणाला उपस्थिती लावली तिच्या ऑनस्क्रीन मुलाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 13:25 IST2017-10-02T07:55:51+5:302017-10-02T13:25:51+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया म्हणजेच दिशा वाकानी गरोदर असून ती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म ...

तारक मेहता का उल्टा चष्मामधील दया म्हणजेच दिशा वाकानीच्या ओटीभरणाला उपस्थिती लावली तिच्या ऑनस्क्रीन मुलाने
त रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया म्हणजेच दिशा वाकानी गरोदर असून ती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तिने सध्या या मालिकेतून ब्रेक देखील घेतला आहे. या मालिकेच्या शवटच्या भागाचे तिने काहीच दिवसांपूर्वी चित्रीकरण केले आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने तिच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले. गेल्या काही महिन्यांपासून दिशा केवळ काही तासच चित्रीकरण करत आहे. तसेच चित्रीकरणाच्या वेळी तिची सासू सतत तिच्यासोबत असते. पण आता दिशाने ब्रेक घेतल्या असल्याने दिशा आता मालिकेत परतणार कधी येणार हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिच्या चाहत्यांना काही महिने तरी तिची वाट नक्कीच पाहावी लागणार आहे.
दिशा वाकानीची ओटीभरणी नुकतीच करण्यात आली असून तिच्या ओटीभरणाला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील तिचा ऑनस्क्रीन मुलगा टप्पू देखील या कार्यक्रमासाठी आर्वजून आला होता. या मालिकेत भाव्या गांधीने टप्पूची भूमिका साकारली होती. सात-आठ वर्षं तो या मालिकेचा भाग होता. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने या मालिकेला रामराम ठोकला. त्याने ही मालिका सोडली असली तरी त्याचे या मालिकेच्या टीमसोबतचे नाते खूपच चांगले आहे. दिशा वाकानी या मालिकेत भाव्याच्या आईच्या भूमिकेत होती. त्यामुळे भाव्या आणि दिशाचे नाते तर खूपच छान आहे. आज भाव्या या मालिकेत नसला तरी त्याचे दिशासोबतचे बाँडिंग कायम आहे आणि त्यामुळेच त्याने आपल्या या ऑनस्क्रीन आईच्या ओटीभरणाला आवर्जून उपस्थिती लावली होती. त्या दोघांनी दिशाच्या ओटीभरणाला एक क्यूटसा फोटो देखील काढला आहे.
![disha vakani and bhavya gandhi]()
दिशा खिचडी या मालिकेत अनेक छोट्या भूमिकांमध्ये झळकली होती. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया या भूमिकेने तिला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवून दिले. या मालिकेत दिशा परतण्याची वाट तिचे फॅन्स आतुरतेने पाहात आहेत.
Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक सोडणार मालिका?