ढोलकीच्या तालावरच्या स्पर्धकांना फ्लॅश मॉब करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 14:01 IST2017-05-08T08:13:21+5:302017-05-08T14:01:15+5:30

ढोलकीच्या तालावर... छोट्यांची अदाकारी लै भारी ! हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सध्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. महाराष्ट्राची ओळख असलेला नृत्य ...

The opportunity for the Flash Mob to compete with the drummer lock | ढोलकीच्या तालावरच्या स्पर्धकांना फ्लॅश मॉब करण्याची संधी

ढोलकीच्या तालावरच्या स्पर्धकांना फ्लॅश मॉब करण्याची संधी

लकीच्या तालावर... छोट्यांची अदाकारी लै भारी ! हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सध्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. महाराष्ट्राची ओळख असलेला नृत्य प्रकार म्हणजे लावणी. लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे आणि म्हणूनच ही नृत्यकला जिवंत राहावी यासाठी ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या कार्यक्रमातील लहान मुलींची निरागस आणि गोंडस अदाकारी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. तसेच मोठ्या मुलींची दिलखेचक अदाकारी देखील कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमामध्ये परीक्षकांचे मन जिंकणारी जोडी परफॉर्मन्स ऑफ द वीक ठरते. या आठवड्यात तो मान औरंगाबादची अनुष्का आणि कल्याणची धनश्री ढोमसे हिने पटकवला. तसेच हा मान मिळवलेल्या जोडीला एक ताकद मिळणार आहे म्हणजेच ही जोडी पुढच्या आठवड्यात सुरक्षित असणार आहे. याचबरोबर या जोडीला प्रेक्षकांमध्ये नृत्य सादर करण्याची सुवर्णसंधी देखील मिळणार आहे.  
अनुष्का आणि धनश्री या जोडीने ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ ही बैठकीची लावणी अतिशय सुंदर आणि दिलखेचक प्रकारे सादर केली आणि परीक्षकांची मने जिंकली. यामुळेच त्यांनी मानाचा फेटा पटकवला. ही जोडी आता येत्या आठवड्यामध्ये सुरक्षित असणार आहे. मानाचा फेटा मिळवल्यानंतर त्यांना फ्लॅश मॉब करण्याची संधी मिळाली. ढोलकीच्या तालावर मधील पुढचा आठवडा ऋतू विशेष असणार आहे. प्रत्येक जोडी या थीमला धरूनच नृत्य सादर करणार आहे. अनुष्का आणि धनश्री हिने देखील या थीमला अनुसरून पाडाला पिकलाय आंबा ही लावणी फ्लॅश मॉबमध्ये सादर केली. हा फ्लश मॉब वाशी येथील सुप्रसिद्ध मार्केट मध्ये त्यांनी सादर केला. यावेळेस तब्बल ५००-७०० इतके प्रेक्षक या दोघींचे नृत्य बघण्यासाठी जमले होते. प्रेक्षकांनी यांच्या नृत्याचा मनसोक्त आंनद लुटला.

Web Title: The opportunity for the Flash Mob to compete with the drummer lock