अरे वाह...! जुन्या मि. बजाजने नव्या मि. बजाजला अशा शब्दांत दिल्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 07:15 IST2019-05-28T07:15:00+5:302019-05-28T07:15:00+5:30

कसौटी झिंदगी की २ या मालिकेतील मि. बजाज ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असून तिचा मालिकेत लवकरच प्रवेश होणार आहे.

Oh wow ...! Old m Bajaj new Mi Wishes given to Bajaj in such words! | अरे वाह...! जुन्या मि. बजाजने नव्या मि. बजाजला अशा शब्दांत दिल्या शुभेच्छा!

अरे वाह...! जुन्या मि. बजाजने नव्या मि. बजाजला अशा शब्दांत दिल्या शुभेच्छा!

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेने या वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका बनण्याची कामगिरी केली आहे. मालिकेच्या कथानकातील नाट्यपूर्णता आणि अनपेक्षित धक्क्यांमुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेची उत्कंठा कायम राहिली आहे. या मालिकेतील मि. बजाज ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असून तिचा मालिकेत लवकरच प्रवेश होणार आहे. मूळ मालिकेत रोनित रॉयने ही भूमिका साकारली होती आणि त्यामुळे त्याच्या अभिनय कारकीर्दीला कलाटणी मिळाली होती. आता नव्या संचातील या मालिकेत ही भूमिका अभिनेता करण सिंग ग्रोव्हर साकारताना दिसणार आहे. पहिल्या भागातील मि. बजाज म्हणजेच अभिनेता रोनित रॉयने या नव्या मि. बजाजच्या भूमिकेसाठी करण सिंग ग्रोव्हरला शुभेच्छा दिल्या आहेत.


रोनित रॉय म्हणाला, “मि. बजाजची व्यक्तिरेखा करण सिंग ग्रोव्हर साकारणार असल्याचे ऐकून मला मोठा दिलासा मिळाला. तो ही भूमिका उत्तमपणे साकारेल, असे मला वाटते. त्याला माझ्या शुभेच्छा. ‘कसौटी झिंदगी की’ आणि मि. बजाज यांना पूर्वीपेक्षाही अधिक लोकप्रियता मिळू दे.”


नव्या अभिनेत्याला या भूमिकेविषयी काही सूचना देणार का, असे विचारता तो म्हणाला, “तो एक कसलेला अभिनेता असून त्याला माझ्या सल्ल्याची गरज नाही. मी इतकेच म्हणेन की शांत राहा!”


आता स्टार प्लसवरील ‘कसौटी झिंदगी की २’चे प्रेक्षक या मालिकेत मि. बजाज कधी प्रवेश करतो, त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Oh wow ...! Old m Bajaj new Mi Wishes given to Bajaj in such words!