तैमूर पाठोपाठ आल्या प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या, तुम्ही पाहिल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 15:27 IST2019-04-28T15:24:43+5:302019-04-28T15:27:58+5:30

करिना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमूर अली खान सारखा हुबेहुब दिसणारा आणि बाजारात प्रचंड मागणी असलेला ‘तैमूर बाहुला’ तुम्ही पाहिलाच. आता प्रेरणा आणि कोमोलिका यांच्या  बाहुल्या मार्केटमध्ये धूम करत आहेत.

Now Hina Khan and Erica Fernandes have dolls fashioned on their look in Kasautii Zindagii Kay 2 |  तैमूर पाठोपाठ आल्या प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या, तुम्ही पाहिल्या?

 तैमूर पाठोपाठ आल्या प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या, तुम्ही पाहिल्या?

ठळक मुद्दे‘कसोटी जिंदगी की 2’ मध्ये प्रेरणा अर्थात एरिका फर्नांडिस आणि कोमोलिका (हिना खान) प्रमुख भूमिकेत आहेत.

करिना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमूर अली खान सारखा हुबेहुब दिसणारा आणि बाजारात प्रचंड मागणी असलेला ‘तैमूर बाहुला’ तुम्ही पाहिलाच. आता प्रेरणा आणि कोमोलिका यांच्या  बाहुल्या मार्केटमध्ये धूम करत आहेत. होय, ‘कसोटी जिंदगी की 2’ या लोकप्रिय मालिकेत प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या बाजारात आल्या आहेत. ‘कसोटी जिंदगी की 2’ची निर्माती एकता कपूरने या बाहुल्यांचे फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

‘कसोटी जिंदगी की 2’ मध्ये प्रेरणा अर्थात एरिका फर्नांडिस आणि कोमोलिका (हिना खान) प्रमुख भूमिकेत आहेत. टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थानी असलेल्या या मालिकेतील प्रेरणा व कोमोलिकाने प्रेक्षकांना जणू वेड लावले आहेत. साहजिकच दोघींचे   फॅन फॉलोइंग प्रचंड आहेत. यामुळेच त्यांच्या बाहुल्या बाजारात आल्या आहेत. ‘ या प्रेमासाठी धन्यवाद. कोमालिकाची बाहुली आणि प्रेरणा बाहुली, तुम्हाला कोणती आवडली?’, असे लिहित एकता कपूरने या बाहुल्यांचे फोटो शेअर केले आहेत.


विशेष म्हणजे, प्रेरणा आणि कोमोलिकाच्या एकाहून अधिक बाहुल्या आहेत. याआधी टीव्ही अभिनेत्रीच्या अंगावरचे दागिणे, त्यांच्या साड्या, त्यांची टिकली, असे  फॅशन ट्रेंड्स फॉलो केल्या जात होते. मात्र पहिल्यांदाच टीव्ही अभिनेत्रींनी मालिकेत साकारलेल्या व्यक्तिरेखेवर बाहुल्या पाहायला मिळत आहेत.

याआधी तैमूरचे टॉय बाजारात आले होते. मात्र करीना कपूर खानला हा तैमूर बाहुला अजिबात आवडला नव्हता. मात्र प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्यांना मोठी पसंती मिळत आहे.  ‘कसोटी जिंदगी की 2’मध्ये प्रेरणा व कोमोलिका साकारणाºया एरिका व हिनासाठी निश्चितपणे ही एक फार मोठी कॉम्पिलीमेंट आहे. 

Web Title: Now Hina Khan and Erica Fernandes have dolls fashioned on their look in Kasautii Zindagii Kay 2