'कसौटी जिंदगी के'मध्ये नमिक पॉल नव्हे, तर हा अभिनेता करणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 07:15 IST2019-04-24T07:15:00+5:302019-04-24T07:15:00+5:30

'कसौटी जिंदगी के' मालिकेत प्रेक्षकांना सध्या संघर्षमय नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. या कलाटण्यांमध्ये आता विक्रांत या आणखी एका नव्या व्यक्तिरेखेची भर मालिकेत पडणार आहे.

Not Namik Paul, but Siddharth Shivpuri to enter Kasautii Zindagii Kay! | 'कसौटी जिंदगी के'मध्ये नमिक पॉल नव्हे, तर हा अभिनेता करणार एन्ट्री

'कसौटी जिंदगी के'मध्ये नमिक पॉल नव्हे, तर हा अभिनेता करणार एन्ट्री


स्टार प्लस वाहिनीवरील 'कसौटी जिंदगी के' मालिकेत प्रेक्षकांना सध्या संघर्षमय नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. या कलाटण्यांमध्ये आता विक्रांत या आणखी एका नव्या व्यक्तिरेखेची भर मालिकेत पडणार आहे. आधी विक्रांतची भूमिका नमिक पॉल हा अभिनेता साकारणार होता, पण आता ही भूमिका सिद्धार्थ शिवपुरी या अभिनेत्याच्या वाट्यास गेली
आहे. 


सिद्धार्थने आजवर अनेक मालिकांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटविला आहे. आता तो ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेतील आपला अभिनय गुणाने प्रेक्षकांची मने जिंकण्यास सिद्ध झाला आहे. या प्रेक्षकांच्या अतिशय आवडत्या मालिकेत सिद्धार्थ शिवपुरी विक्रांतची भूमिका साकारणार आहे.

या मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे आनंदित झालेल्या सिद्धार्थने सांगितले, कसौटी जिंदगी के’सारख्या प्रेक्षकांच्या अतिशय आवडत्या आणि पूर्वीच्या मालिकेची जादू पुन्हा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या मालिकेत मला भूमिका रंगविण्यास मिळत असल्याचा मला खूप आनंद झाला आहे. विक्रांतच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू असून त्यामुळे ही वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारण्यास मी अधीर झालो आहे. मी या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करीन. जी मालिका येती अनेक वर्षं प्रेक्षकांच्या स्मरणात राहील, अशा या मालिकेत माझा सहभाग झाल्याने मी खुशीत आहे.


सिद्धार्थच्या प्रवेशामुळे स्टार प्लसवरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत प्रेक्षकांना नव्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळतील. त्यामुळे मालिकेचे कथानक अधिकच नाट्यपूर्ण बनेल.

प्रेक्षक या मालिकेत गुंतून गेले असून त्यातील सर्वच प्रमुख कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे.

Web Title: Not Namik Paul, but Siddharth Shivpuri to enter Kasautii Zindagii Kay!