सगळेच कलाकार श्रीमंत असतात असे नाही, दिव्यांकाने सोशल मीडियावर सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 07:15 IST2019-01-31T07:15:00+5:302019-01-31T07:15:00+5:30

दिव्यांकाने  दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रसिकांशी संवाद साधत असते.  इथे ती आपले नवनवे फोटो फॅन्ससह शेअरही करते.

Not all artists are rich, they have been told on social media | सगळेच कलाकार श्रीमंत असतात असे नाही, दिव्यांकाने सोशल मीडियावर सुनावले खडेबोल

सगळेच कलाकार श्रीमंत असतात असे नाही, दिव्यांकाने सोशल मीडियावर सुनावले खडेबोल

'ये है मोहब्बते' मालिकेत दिव्यांका इशिताची भूमिकेत झळकत आहे. या भूमिकेतून ती लोकप्रिय झाली आहे. शिवाय तिला चाहत्यांचे भरभरून प्रेमही मिळाले आहे. दिव्यांकाने  दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रसिकांशी संवाद साधत असते.  इथे ती आपले नवनवे फोटो फॅन्ससह शेअरही करते. नुकतंच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील तिचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत आहे. तिच्या या फोटोला खूप सारी पसंती मिळत आहे.तर दुसरीकडे याच फोटोमुळे ती ट्रोलही होत आहे.

त्याचे झाले असे की, दिव्यांकाने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिची ड्रेसिंग स्टाइल पाहून अनेकांनी तिला सब्यसाची स्टाइल कॉपी केल्याचे म्हटले होते. दिव्यांकाने कमेंटस पाहून चोख उत्तर दिले. तिने म्हटले की, मी इतरांप्रमाणे जास्त स्टायलिश नसली तरी मी वेगळी आहे. ज्यांना कोणाला माझा ड्रेसिंग सेन्स आवडत नाही त्यांनी कमेंट करू नये. हे मुळीच स्विकार नाही. माझी स्टाइल कशी असावी हे मी ठरवणार. हा तर विचार करा की सगळेच सेलिब्रेटी हे ब्रँडेड डिझायन कपडे परिधान करतील असे नाही. कारण सगळेच कलाकार हे पैशांनी श्रीमंत असतात असे नाही. त्यामुळे जरा बोलताना विचार करा असे खडे बोल सुनावले आहेत.         
 

Web Title: Not all artists are rich, they have been told on social media