'बिग बॉस'मध्ये आज कोणीच घराबाहेर गेलं नाही पण रितेशने सांगितलेल्या ट्विस्टने सर्वांची चिंता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 23:13 IST2024-08-11T23:11:56+5:302024-08-11T23:13:36+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून आज कोणी घराबाहेर गेलं नाही. परंतु सहा नॉमिनेटेड सदस्यांसाठी घरात मोठा ट्विस्ट रितेशने सांगितलाय (bigg boss marathi 5)

no elimination in Bigg Boss marathi 5 today but riteish deshmukh new twist | 'बिग बॉस'मध्ये आज कोणीच घराबाहेर गेलं नाही पण रितेशने सांगितलेल्या ट्विस्टने सर्वांची चिंता कायम

'बिग बॉस'मध्ये आज कोणीच घराबाहेर गेलं नाही पण रितेशने सांगितलेल्या ट्विस्टने सर्वांची चिंता कायम

बिग बॉस मराठीच्या नवीन सिझनमध्ये आज मोठा ट्विस्ट घडला. रितेश देशमुखने भाऊचा धक्का पार पडला. या धक्क्यावर अक्षय कुमार आणि 'खेल खेल मैं' सिनेमाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सहा सदस्य नॉमीनेट होते. त्यापैकी आज कोणीच घराबाहेर गेलं नाही. त्यामुळे सर्वांना एक दिलासा मिळाला. पण भाऊच्या धक्क्यावर रितेशने सर्व स्पर्धकांना एक ट्विस्ट सांगितला. तो कोणता?

या आठवड्यात कोणी घराबाहेर नाही पण...

बिग बॉस मराठीच्या नवीन सिझनमध्ये या आठवड्यात योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, पॅडी कांबळे, निक्की तांबोळी, निखिल दामले आणि घनश्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमीनेट होते. त्यापैकी या आठवड्यात कोणीच घराबाहेर गेलं नाही. पण ट्विस्ट असा होता की, हे सहा सदस्य पुढच्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमीनेट झाले आहेत. त्यामुळे सहा जणांवर नॉमीनेशनची टांगती तलवार कायम राहणार आहे. त्यामुळे आज जरी या सहा जणांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरीही हे सहाही सदस्य पुढच्या आठवड्यात नॉमीनेट झाल्याने त्यांची चिंता अजून संपली नाही. 


बिग बॉसच्या घरात येणार नवीन सदस्य?

आज सहा नॉमीनेटेड सदस्यांना सेफ करण्याबरोबरच रितेश देशमुखने घरात आणखी एक ट्विस्ट सांगितला. तो म्हणजे उद्या अर्थात सोमवारी घरात एक नवीन सदस्य एन्ट्री घेणार आहे. हा सदस्य बिग बॉसचा खास आहे, असं रितेश जाहीर केलंय. आता हा नवीन सदस्य कोण असणार? घरातील पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक असणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेल.

Web Title: no elimination in Bigg Boss marathi 5 today but riteish deshmukh new twist