निया शर्माचा लेस्बियन किस होतोय व्हायरल, म्हणतेय- पुरुषाला किस करणे जास्त सोपे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 22:28 IST2021-03-23T22:28:38+5:302021-03-23T22:28:58+5:30

ट्विस्टेड नावाच्या या वेबसीरिजमध्ये नियाने ईशा शर्मा नावाच्या अभिनेत्रीसोबत हा सीन दिला आहे

Niya Sharma's lesbian kiss is going viral, she says- it is easier to kiss a man! | निया शर्माचा लेस्बियन किस होतोय व्हायरल, म्हणतेय- पुरुषाला किस करणे जास्त सोपे!

निया शर्माचा लेस्बियन किस होतोय व्हायरल, म्हणतेय- पुरुषाला किस करणे जास्त सोपे!

‘नागीन’ फेम निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे बोल्ड व ग्लॅमरस फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा या बोल्ड फोटोंमुळे निया ट्रोलही होते. मात्र तिला अजिबात काहीही फरक पडत नाही. दरम्यान नियाच्या एका लेस्बियन किसची चर्चा सध्या होत आहे. ट्विस्टेड नावाच्या या वेबसीरिजमध्ये नियाने ईशा शर्मा नावाच्या अभिनेत्रीसोबत हा सीन दिला आहे


या सीनवरून आणि एकंदरच या वेबसीरिजच्या अनुभवावर विचारलेल्या प्रश्नांना नियाने उत्तर दिली आहेत. या सीनमुळे आपल्या वेबसीरिजला फायदा झाल्याचे तिने म्हटले आहे. या सीनच्या चित्रीकरणावेळी मनात आलेल्या अनेक शंकाकुशंका तिने बोलून दाखवल्या.


ती म्हणाली की, कथेच्या वेगळेपणामुळे मी ही सीरिज स्वीकारली. पण, हे दृश्य चित्रीत करताना मला भयंकर अस्वस्थ वाटत होते. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आता वाटते की पुरुषासोबत असा सीन देणे जास्त सोपं आहे. पुन्हा जर असा सीन असेल तर मी हो म्हणेन अशी शक्यता कमी आहे, असेही निया या वेळी म्हणाली.

निया शर्मा म्हणजे, छोट्या पडद्यावरची बोल्ड अभिनेत्री. निया ही छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. नियाने फोटो शेअर केलेत आणि त्याची चर्चा झाली नाही, असे अभावानेच घडते. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली.

Web Title: Niya Sharma's lesbian kiss is going viral, she says- it is easier to kiss a man!