निवेदिता सराफ यांनी 'भाग्य दिले तू मला' मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 04:14 PM2023-07-10T16:14:54+5:302023-07-10T16:15:20+5:30

Bhagya Dile Tu Mala : भाग्य दिले तू मला मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत कावेरीच्या अपघातानंतर एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळाला.

Nivedita Saraf took a break from the serial 'Bhagya Dile Tu Mala', the reason came to light | निवेदिता सराफ यांनी 'भाग्य दिले तू मला' मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर

निवेदिता सराफ यांनी 'भाग्य दिले तू मला' मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर

googlenewsNext

कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला (Bhagya Dile Tu Mala) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत कावेरीच्या अपघातानंतर एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळाला. कावेरी आणि राज यांचे वैवाहिक जीवन कुठे सुरळीत सुरू असतानाच कावेरी दरीत कोसळते. यामुळे कावेरीला स्मृतीभ्रंश झालेला असतो. या ट्विस्टमुळे मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवर पोहोचली आहे. कावेरी आता राजला ओळखत नसल्याने या दोघांची नोकझोक सुरू आहे. पण अशातच रत्नमाला या मालिकेतून गायब झालेल्या पाहायला मिळत आहेत. रत्नमालाची भूमिका निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी साकारली आहे. त्यांनी मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे. त्यामागचे कारण समोर आले आहे.

निवेदिता सराफ व्हॅक्यूम क्लिनर या नाटकानिमित्त परदेश दौऱ्यावर गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच या नाटकाची टीम सिडनीला रवाना झाली होती. तिथे या नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग करण्यात आले आहेत. निवेदिता सराफ आणि अशोक सराफ दोघेही एकत्रित मुंबईच्या एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्यावेळी अशोक सराफ यांनी मीडियाला पोज देत मोबाईल गहाळ झाला असल्याचे म्हटले होते. यानिमित्ताने एअरपोर्टवर अशोक सराफ यांचा काही काळ गोंधळ उडाला होता.


शुक्रवारी सिडनीमध्ये व्हॅक्यूम क्लिनर या नाटकाचा प्रयोग झाला. कोरोनाचा काळ वगळता गेल्या चार वर्षांपासून व्हॅक्यूम क्लिनर हे नाटक प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या नाटकाच्या प्रयोगानंतर निवेदिता सराफ टीमसह भारतात परतणार आहेत. त्यानंतर त्या पुन्हा मालिकेत रुजू होणार आहेत. 

Web Title: Nivedita Saraf took a break from the serial 'Bhagya Dile Tu Mala', the reason came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.