करिना कपूरप्रमाणे नीती टेलरला मिळाला पोपट, ‘भोले’च्या रूपात बनला एक जिवलग मित्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 14:11 IST2017-01-24T07:52:32+5:302017-01-24T14:11:43+5:30
'मै प्रेम की दिवानी हुँ' या सिनेमातली पोपटशी गप्पा मारणारी करिना कपूर तुम्हाला आठवत असेल. तसाचा काहीसा प्रकार आता ...
करिना कपूरप्रमाणे नीती टेलरला मिळाला पोपट, ‘भोले’च्या रूपात बनला एक जिवलग मित्र!
' ;मै प्रेम की दिवानी हुँ' या सिनेमातली पोपटशी गप्पा मारणारी करिना कपूर तुम्हाला आठवत असेल. तसाचा काहीसा प्रकार आता छोट्या पडद्यावर नीती टेलरसह पाहयला मिळणार आहे. करिनाचा हा चुलबुला अंदाजही रसिकांना चांगलाच भावला होता. आता छोट्या पडद्यावरचा नीतीचा हाच अंदाज रसिकांना भावणार की नाही याशिवाय अात्ताच सांगणे कठीण असले तरीही नीतीने यासाठी खूप मेहनत घेतली आहे.‘कैसी ये यारीयाँ (केवाय2)’ मालिकेतील भूमिकेद्वरे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या नीती टेलर आता ‘लाईफ ओके’वरील ‘गुलाम’ मालिकेद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेणार आहे. परमसिंह आणि विकास मानकताला या दोन आजच्या पिढीच्या आवडत्या अभिनेत्यांच्या साथीने ती दैनंदिन मालिकांमध्ये आपली कारकीर्द उभी करण्याचा प्रयत्न करणार आहे.उत्साही आणि बडबड्य़ा स्वभावाच्या नीती टेरला सेटवर एक जिवलग दोस्त मिळाला आहे.
![]()
तुम्हाला आश्चर्य वाटेल,पण हा दोस्त तिचा कोणी सहकलाकार नसून शिवानीच्या (मालिकेतील नीतीचे नाव) जीवनात महत्त्वाची भूमिका साकारणारा एक पोपट आहे.नीती या पोपटाला भोले म्हणून हाक मारते. आपल्या या नव्या जिवलग मित्राविषयी नीती म्हणाली, “मालिकेत हा पोपटच शिवानीचा विश्वासू आणि मित्र आहे. भोले हा अतिशय प्रेमळ असून मला त्याच्याबरोबर चित्रीकरण करायला आवडतं. सेटवर माझा सर्वात आवडता तोच आहे. तो माझ्यासाठी जणू जिवलग मित्र बनला आहे. मी त्याच्याशी दिवसभर बोलू शकते. ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’ चित्रपटातील करीनासारखी माझी अवस्था झाली आहे.”