तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत हा कलाकार साकारणार डॉ. हाथीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 16:51 IST2018-09-07T16:49:33+5:302018-09-07T16:51:34+5:30

डॉ. हाथी यांच्या भूमिकेसाठी एका कलाकाराची निवड करण्यात आली असल्याची चर्चा आहे आणि या कलाकाराची एंट्री लवकरच मालिकेत होणार आहे.

nirmal soni will replace kavi kumar azad in Tarak Mehta ka ulta chashma | तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत हा कलाकार साकारणार डॉ. हाथीची भूमिका

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत हा कलाकार साकारणार डॉ. हाथीची भूमिका

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत डॉ. हाथी यांची भूमिका कवी कुमार आझाद साकारत होते. पण काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असे. प्रेक्षक त्यांना डॉ. हाथी या नावानेच ओळखू लागले होते. त्यांच्याशिवाय प्रेक्षक या मालिकेचा विचार देखील करू शकत नाही. त्यामुळे डॉ. हाथीच्या भूमिकेत कोणत्याही कलाकाराला निर्मात्यांनी घेऊ नये असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. पण शो मस्ट गो ऑन असे म्हटले जाते. त्यामुळे डॉ. हाथी यांच्या भूमिकेसाठी एका कलाकाराची निवड करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

कवी कुमार आझाद यांच्याआधी या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका निर्मल सोनी साकारत होता. निर्मलने २००८ मध्ये मालिका सोडल्यामुळेच कवी कुमार आझाद यांना ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुरुवातीपासून निर्मलच डॉ. हाथी यांची भूमिका साकारत असला तरी प्रेक्षकांना या भूमिकेत कवी कुमार आझाद अधिक भावले होते. आता त्यांच्या निधनानंतर ही भूमिका पुन्हा निर्मल सोनी साकारणार आहे. 

गोकुलधाम सोसायटीमध्ये गणेशोत्सवाच्या धामधुमीत डॉ. हाथीच्या भूमिकेत निर्मलची एंट्री होणार आहे. गोकुळधाममधील गणेशोत्सवात डॉ. हाथीचे कुटुंब गणपतीची पहिली आरती करणार असे टप्पू सेना ठरवणार आहे. पण आत्माराम भिडे एक स्वप्न पाहाणार आहे. त्यात गणपती बाप्पा त्याला सांगणार आहे की, मी येणार नाहीये. त्यामुळे आपले हे स्वप्न पूर्ण होऊ नये अशी सतत तो प्रार्थना करणार आहे. 

निर्मलच डॉ. हाथीच्या भूमिकेत दिसणार का याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, डॉ. हाथीची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. आम्ही काही लोकांची निवड केली असून त्यांच्यासोबत चित्रीकरण करत आहोत. डॉ. हाथीच्या भूमिकेसाठी आम्ही लवकरच त्यामधील एकाची निवड करणार आहोत.  

Web Title: nirmal soni will replace kavi kumar azad in Tarak Mehta ka ulta chashma