निक्कीला बोलला? बॉयफ्रेंडची सटकली; शिव ठाकरे-अरबाज पटेलमध्ये जोरदार राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:45 IST2026-02-06T16:41:56+5:302026-02-06T16:45:01+5:30
निक्कीला बोलल्यामुळे तिचा बॉयफ्रेंड अरबाज आणि शिव यांच्यात मारामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं. नक्की काय घडलं?

निक्कीला बोलला? बॉयफ्रेंडची सटकली; शिव ठाकरे-अरबाज पटेलमध्ये जोरदार राडा
कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणारा 'द ५०'शो सध्या चर्चेत आहे. शोमध्ये अनेक ओळखीचे मराठी चेहरेही सहभागी झाले आहेत. निक्की तांबोळी, बॉयफ्रेंड अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, शिव ठाकरे आणि आर्या जाधव यांचा यात समावेश आहे. स्पर्धकांना टीम्समध्ये विभागण्यात आलं असून रोज नवनवीन टास्क दिले जात आहेत. काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यात झालेलं भांडण चव्हाट्यावर आलं होतं. तर आता चक्क निक्की आणि शिव यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. निक्कीला बोलल्यामुळे तिचा बॉयफ्रेंड अरबाज आणि शिव यांच्यात मारामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं. नक्की काय घडलं?
शोमधील एका टास्कदरम्यान (ज्याला 'अलार्म क्लॉक टास्क' म्हटले जात आहे) निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झाली. स्पर्धकांना करंट लागणार असा तो टास्क होता. हा टास्क करण्यात निक्कीने नकार दिला. यावरुन आधी आर्या आणि निक्की यांच्यात भांडण झालं. नंतर टास्क न करण्यावरुन शिव निक्कीला बोलताना दिसला. शिवने काही चुकीचे शब्द वापरल्याने अरबाज वैतागला आणि त्याने शिवला हात लावला. यानंतर शिवने अरबाजला मागे ढकललं. 'बोलून भांडायचं, हात लावलास तर...' असं म्हणत शिव अरबाजवर भडकतो.
हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिव आणि अरबाजच्या भांडणात इतर स्पर्धकही त्यांना थांबवण्यासाठी आले. अरबाज आणि शिवचा वाद आता टोकाला जाणार की काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.