​बिन कुछ कहे या मालिकेतील निखिल सभरवाल बनला फिटनेस गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 14:48 IST2017-04-12T09:18:28+5:302017-04-12T14:48:28+5:30

बिन कुछ कहे या मालिकेत निखिल सभरवाल अक्षय शर्मा ही भूमिका साकारत आहे. अक्षय हा त्याच्या अभिनयाच्या बाबतीत जितका ...

Nikhil Sabharwal became the fitness guru in the series | ​बिन कुछ कहे या मालिकेतील निखिल सभरवाल बनला फिटनेस गुरू

​बिन कुछ कहे या मालिकेतील निखिल सभरवाल बनला फिटनेस गुरू

न कुछ कहे या मालिकेत निखिल सभरवाल अक्षय शर्मा ही भूमिका साकारत आहे. अक्षय हा त्याच्या अभिनयाच्या बाबतीत जितका सतर्क आहे, तितकाच तो त्याच्या फिटनेसच्याबाबतीतदेखील आहे. या मालिकेत शिवम सूद त्याच्या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे. तो सध्या त्याच्या या सहकलाकाराचा फिटनेस गुरू बनला आहे. या मालिकेचे चित्रीकरण जयपूर येथे होत असल्याने या मालिकेची संपूर्ण टीम गेल्या कित्येक महिन्यांपासून जयपूर येथेच आहे. त्यामुळे या मालिकेतील सगळेच कलाकार एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. या मालिकेतील कलाकार चित्रीकरण संपवल्यानंतरही अधिकाधिक वेळ एकमेकांसोबतच घालवतात. निखिल आणि शिवम तर एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. निखिल नेहमीच शिवमला डाएट आणि वर्कआऊट संबंधित टिप्स देत असतो. या त्याच्या टिप्सचा शिवमला प्रचंड फायदादेखील होत आहे. या वर्कआऊट आणि डाएटमुळे त्याने दोन महिन्यातच जवळजवळ पाच किलो वजन कमी केले आहे. शिवमचे वजन कमी झाल्यामुळे त्याच्या नव्या लूकचे सगळेच कौतुक करत आहेत. याविषयी शिवम सांगतो, "जयपूरमध्ये सुरुवातीला मी निखिलसोबत नव्हे तर माझ्या काही महिला सहकाऱ्यांसोबत व्यायाम करत असे. त्यावेळी मी केवळ फिट राहाण्यासाठी व्यायाम करत होतो. पण निखिलची शरीरयष्टी खूपच चांगली आहे. त्यामुळे मी त्याला त्याच्या व्यायामाबद्दल विचारले. त्याच्या व्यायामाबद्दल ऐकून हा काय मुर्खपणा असा मला प्रश्न पडला होता. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्यानंतर आम्ही दोघे एकाच घरात राहायला लागलो आणि खूप चांगले मित्र बनलो. तेव्हापासून तो माझ्या डाएटवर लक्ष द्यायला लागला आणि मला व्यायामाच्या टिप्स द्यायला लागला. चित्रीकरणामुळे खरे तर व्यायाम करायला वेळ मिळत नाही. पण त्यातूनच मी वेळ काढून काही वेळ तरी निखिलसोबत व्यायाम करतो. मी जे काही वजन कमी केले आहे, त्याचे सगळे श्रेय निखिललाच जाते. 


Web Title: Nikhil Sabharwal became the fitness guru in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.