तुझ्यात जीव रंगला मालिकेत नवं वळण, नंदिता वहिनी आणि राजा येणार आमना सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 06:30 IST2019-07-04T06:30:00+5:302019-07-04T06:30:00+5:30

तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच मालिकेत राजा राजगोंडाची एंट्री झालेली प्रेक्षकांनी पाहिली.

New twist will come in tujhyat jeev rangala | तुझ्यात जीव रंगला मालिकेत नवं वळण, नंदिता वहिनी आणि राजा येणार आमना सामना

तुझ्यात जीव रंगला मालिकेत नवं वळण, नंदिता वहिनी आणि राजा येणार आमना सामना

ठळक मुद्देराजाच्या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळंच रूप आलं

तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच मालिकेत राजा राजगोंडाची एंट्री झालेली प्रेक्षकांनी पाहिली. राजाच्या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळंच रूप आलं. आता हा राजाच राणा आहे कि नाही हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरेल. 

कुस्ती खेळणारा हार्दिक आता चक्क चोर बनला आहे. त्याचे नाव राजा राजगोंडा असून त्याला सगळे आर आर म्हणून ओळखतात. मारामारी करणारा जीन्स, टी-शर्ट आणि गॉगलमधील हार्दिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या टीमला खात्री आहे आणि विशेष म्हणजे नव्या लूकमध्ये हार्दिकच्या मिशीची स्टाईल देखील वेगळी आहे. 

तुझ्यात जीव रंगला मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि नंदिता राजाला गावात घेऊन ये असं पप्याला सांगते. नंदिताच्या डोक्यात काहीतरी शिजतंय. राजाला मागेल ती किंमत देऊन राणा बनवून गावात घेऊन यायचं नंदिता ठरवते. राजाने राणा बनून कोर्टासमोर सही करुन सगळी प्रॉपर्टी कायदेशीररित्या तिच्या नावावर करायची असा तिचा डाव आहे. पण राजा नंदिताचा प्लॅन यशस्वी करणार का? कि तिला आणि पप्याला धडा शिकवणार? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Web Title: New twist will come in tujhyat jeev rangala