सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिमन्यू दौलतकडे नोकरी करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 20:06 IST2021-06-16T20:03:40+5:302021-06-16T20:06:34+5:30

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका रंजक वळणावर पोहचली आहे.

new twist in sundara manamadhe bharli | सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिमन्यू दौलतकडे नोकरी करणार का?

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिमन्यू दौलतकडे नोकरी करणार का?

ठळक मुद्देआता मालिकेने २५० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.

रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने आज २५० भागांचा पल्ला गाठला. मालिकेमधील लतिका आणि अभिमन्युची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली... आता मालिकेने २५० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टिंसिन्ग आणि योग्य ती काळजी घेत मालिकेचे शूट सुरू आहे. 

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. अभिमन्युला दौलतने दिलेली नोकरीची ऑफर त्याने नाकारली असून दौलतच्या आईच्या म्हणण्यावरून नोकरीची ऑफर अभी स्वीकारेल? याबद्दल अभी लतिकाला सांगू शकेल?  लतिकाला हे कळल्यावर काय होईल? कोणते नवे वळण मालिकेला येणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

या मालिकेने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. शरीराच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता महत्वाची आहे. हे यातून सांगण्यात आलं आहे. यातील गोड जोडी अभिमन्यू आणि लतिका यांचं उंदीर मांजराचं प्रेम आत्ता प्रेमात बदलत आहे.

Web Title: new twist in sundara manamadhe bharli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.