‘नकळत सारे घडले’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 18:55 IST2019-02-01T18:54:31+5:302019-02-01T18:55:02+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत सध्या नेहा आणि प्रतापच्या नात्यात दुरावा पाहायला मिळतो आहे.

New twist to the series 'Nakalat Saare Ghadle' | ‘नकळत सारे घडले’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट

‘नकळत सारे घडले’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट

ठळक मुद्देआता मालिकेत नचिकेत या नव्या पात्राची होणार एण्ट्री


स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत सध्या नेहा आणि प्रतापच्या नात्यात दुरावा पाहायला मिळतो आहे. प्रतापच्या मनाविरुद्ध जाऊन नेहाने मायाला जेलमधून सोडवण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट प्रतापला खटकली. गैरसमज इतके टोकाला गेले की अखेर दोघांवर एकमेकांपासून वेगळे राहण्याची वेळ ओढावली. नेहा-प्रतापच्या भांडणात चिमुकली परी मात्र आईच्या मायेला पारखी होते. एकीकडे नेहा-प्रतापच्या नात्याचा संघर्ष सुरु असताना आता मालिकेत नचिकेत या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे नचिकेतची भूमिका साकारणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना आस्ताद म्हणाला, ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा खूपच खास आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातला, साधासरळ, आईची सेवा करणारा असा आदर्श मुलगा तो या मालिकेत साकारणार आहे. नचिकेतच्या येण्याने नेहा-प्रतापच्या आयुष्यात कोणते नवे वळण येणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.’

‘नकळत सारे घडले’ या मालिकेचे कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. त्यासाठी ‘नकळत सारे घडले’ सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला विसरु नका. 

Web Title: New twist to the series 'Nakalat Saare Ghadle'