सारे तुझ्याचसाठी या मालिकेत श्रुती-कार्तिकच्या नात्याला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 17:26 IST2018-11-20T17:18:19+5:302018-11-20T17:26:42+5:30

सोनी मराठीवर सुरू असलेल्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत सध्या श्रुती-कार्तिकच्या लग्नाची लगीनघाई पाहायला मिळत आहे.

New twist in Sare tuzyachsathi serial | सारे तुझ्याचसाठी या मालिकेत श्रुती-कार्तिकच्या नात्याला मिळणार हे वळण

सारे तुझ्याचसाठी या मालिकेत श्रुती-कार्तिकच्या नात्याला मिळणार हे वळण

ठळक मुद्देश्रुती-कार्तिकचा साखरपुडा झाल्यानंतर बॉक्सिंगच्या प्रेमाखातर श्रुतीने लग्नापुढे केलेली बॉक्सिंगची निवड आणि त्यामुळे मोडलेला साखरपुडा. नव्याने फुलणाऱ्या या गोड नात्याला पूर्णविराम लागतो की काय असं वाटत असतानाच कार्तिकच्या पुढाकाराने शेवटी हे सुत जुळले.श्रुतीच्या सरांना लग्नानंतर श्रुतीच्या बॉक्सिंगवर काहीही परिणाम होणारी नाही, असं वचन देत लग्नासाठी परवानगी मिळवली आणि तुळशीच्या लग्नानंतरचा पहिला मुहूर्त बघून आपल्या लग्नाचा बार उडवून द्यायचा निर्णय घेतला.  

दिवाळीचा सण सरला आणि तुळशीचं लग्न लागलं की, सुरुवात होते लगीन सराईला... लग्न... एक असा सण, ज्यात दोन जीवांचं होतं मिलन... जितकी तयारी एखाद्या सणाची व्हावी त्याच्या दुपटीने, लग्नाची तयारी केली जाते... हीच लगीनघाई सध्या पाहायला मिळते आहे सोनी मराठीवर सुरू असलेल्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत... निमित्त आहे श्रुती-कार्तिकच्या लग्नाचं....

सारे तुझ्याचसाठी ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच आवडत आहेत. 

तसं पाहायला गेलं तर श्रुती-कार्तिकचे अरेंज मॅरेज... पण या दोघांमध्ये प्रेम कधी उमललं त्यांचं त्यांनाही कळलं नाही. या दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर बॉक्सिंगच्या प्रेमाखातर श्रुतीने लग्नापुढे केलेली बॉक्सिंगची निवड आणि त्यामुळे मोडलेला यांचा साखरपुडा... नव्याने फुलणाऱ्या या गोड नात्याला पूर्णविराम लागतो की काय असं वाटत असतानाच कार्तिकच्या पुढाकाराने शेवटी हे सुत जुळलं... दुरावा सहन न झाल्याने कार्तिकने श्रुतीच्या सरांना लग्नानंतर श्रुतीच्या बॉक्सिंगवर काहीही परिणाम होणारी नाही, असं वचन देत लग्नासाठी परवानगी मिळवली आणि तुळशीच्या लग्नानंतरचा पहिला मुहूर्त बघून आपल्या लग्नाचा बार उडवून द्यायचा निर्णय घेतला.  

लग्नाआधी मनाला लागणारी हूरहूर या दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसते आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये आता लगीनघाई सुरू झाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत एकमेकांसाठी निर्माण झालेली ओढ... त्या ओढीतून सहवासासाठी शोधली जाणारी वेगवेगळी कारणं ‘सारे तुझ्याचसाठी’ या कार्यक्रमाच्या शीर्षकाला अगदी तंतोतंत लागू पडत आहेत. लग्नसोहळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आमंत्रणाचं...याला २० तारखेपासून सुरुवात होणार आहे तर याच दरम्यान त्यांचं केळवणही होणार आहे. २२ ला कार्तिकची बॅचलर्स पार्टी तर २३ ला मेहेंदीचा कार्यक्रम आहे. २४ ला हळद आणि २६ तारखेला हे दोन वेगळ्या ध्रुवावरचे जीव एकत्र येणार आहेत.

वेगळे स्वभाव, वेगळी व्यक्तिमत्त्व, विरुद्ध टोकाच्या आवडी जोपासणाऱ्या श्रुती–कातिर्कच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सोनी मराठीवर सुरू आहे.

Web Title: New twist in Sare tuzyachsathi serial