'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट, कार्तिक-दीपाच्या प्रेमात पुन्हा विघ्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:11 IST2023-02-01T12:10:38+5:302023-02-01T12:11:27+5:30

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काही दिवसांपूर्वीच कार्तिक आणि दीपाचं पुन्हा लग्न पार पडलं. त्यानंतर आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.

New twist in the series 'Rang Maza Vegala', Karthik-Deepa's love again breaks down | 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट, कार्तिक-दीपाच्या प्रेमात पुन्हा विघ्न

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट, कार्तिक-दीपाच्या प्रेमात पुन्हा विघ्न

रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेत काही दिवसांपूर्वीच कार्तिक आणि दीपाचं पुन्हा लग्न पार पडलं. श्वेताचे कारस्थानही सर्वांसमोर उघडकीस आले. असं असतानाही श्वेताला माफ करून दिपाने इथे मात्र एक चूक केलेली आहे. कारण या सगळ्याचा बदला आता ती पुन्हा एकदा घेणार आहे. 

मालिकेत कार्तिक आणि दीपा आपल्या कुटुंबासोबत पिकनिकला जात असतात. पिकनिकमध्ये कार्तिकी टेरेसवरून खाली पडते तेव्हा कार्तिक धावत जाऊन तिला वाचवतो. यामध्ये दीपाची मैत्रीण आणि तिचा मुलगाही सहभागी होतो. मात्र कार्तिकने केलेला प्लान साक्षीला खटकतो. दीपा आणि कार्तिकने फिरण्यासाठी दुसरे कुठले ठिकाण निवडायला हवे होते असे ती तिला म्हणते. आता हीच साक्षी कार्तिकला रस्त्याने जाताना दिपाचा पाठलाग करताना पकडणार आहे. हे पाहून साक्षीला मात्र एक वेगळीच शंका येते. अजूनही कार्तिकचा दिपावर विश्वास नाही हे पाहून ती त्याला जाब विचारते. तेव्हा कार्तिक साक्षीवर चिडतो आणि तिला जीवे मारण्याची धमकी देतो.

मालिकेतला हा नवा ट्विस्ट नेमका काय असणार आहे असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. एकीकडे श्वेता दिपाने आपल्याला मारले म्हणून संतापली आहे. त्यामुळे हा नवा डाव श्वेताने तर आखला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. मालिकेचा हा ट्विस्ट मात्र प्रेक्षकांना मुळीच रुचलेला नाही. 

Web Title: New twist in the series 'Rang Maza Vegala', Karthik-Deepa's love again breaks down