'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, अखेर कार्तिकीला समजणार कार्तिक तिचा बाबा असल्याचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 11:33 IST2022-05-27T11:33:01+5:302022-05-27T11:33:50+5:30

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेत कार्तिकीसमोर येणार कार्तिक तिचा बाबा असल्याचं सत्य, आता दिपा काय करणार

New twist in 'Rang Mazha Vegla', Karthik will finally understand the truth that Karthik is her father | 'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, अखेर कार्तिकीला समजणार कार्तिक तिचा बाबा असल्याचं सत्य

'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, अखेर कार्तिकीला समजणार कार्तिक तिचा बाबा असल्याचं सत्य

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. इनामदारांची घरी कार्तिकीची खोटी आई आल्यावर कार्तिक दिपाला कार्तिकीला घेऊन घरी राहायला यायला सांगतो. त्यानंतर आता सौंदर्या दिपाच्या घरी जाऊन तिला कार्तिकसोबत इनामदारांच्या घरी परत येण्याची विनंती करताना दिसतेय. 

नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात सौंदर्या दिपाच्या घरी गेलेली दिसतेय. आणि तिला परत कार्तिदसौंदर्यामधलं बोलणं  ऐकते.दिपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र  आणण्यासाठी सौंदर्या प्रयत्न करताना दिसतेय.

 दिपा तिला कार्तिक आणि तिचं पुन्हा एकत्र येणं अशक्य असल्याचं सांगताना दिसतेय. सौंदर्या दिपाला तू आणि कार्तिकने पुन्हा एकत्र यावं त्यामुळे कार्तिकीला तिचा हक्काचा बाबा मिळेल असं सांगते. दिपा सौंदर्याला सांगते यातलं कार्तिकीला काहीच कळता कामा नये इतक्या वर्षे कार्तिकी मला तिच्या बाबांचं नाव विचारतेय पण मी तिला कार्तिकचं तिचा बाबा आहे हे सांगू शकले नाही. दीपा आणि सौंदर्याचे सगळे बोलणं कार्तिकी ऐकते आणि त्याला धक्का बसतो. कार्तिकीला कार्तिकचं त्याचा बाबा असल्याचं सत्य समजल्यावर ती काय करणार?, कार्तिक आणि दीपा मुलींसाठी पुन्हा एकत्र येणार का?, कार्तिकीला तिचा बाबा परत मिळणार का?, हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

Web Title: New twist in 'Rang Mazha Vegla', Karthik will finally understand the truth that Karthik is her father