'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट; रत्नमाला आणि राजवर्धनच्या नात्यात गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 16:37 IST2023-12-14T16:36:19+5:302023-12-14T16:37:44+5:30

Bhagya Dile Tu Mala : भाग्य दिले तू मला या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सध्या मालिकेत रत्नमाला आणि राजवर्धन यांच्या नात्यात आलेला दुरावा पाहिला आता या आई मुलाच्या नात्यात गोडवा पाहायला मिळणार आहे.

New twist in 'Bhagya Dile Tu Mala' series; Sweetness in Ratnamala and Rajvardhan's relationship | 'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट; रत्नमाला आणि राजवर्धनच्या नात्यात गोडवा

'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट; रत्नमाला आणि राजवर्धनच्या नात्यात गोडवा

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कावेरी आणि राजवर्धन यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. आता या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सध्या मालिकेत रत्नमाला आणि राजवर्धन यांच्या नात्यात आलेला दुरावा पाहिला आता या आई मुलाच्या नात्यात गोडवा पाहायला मिळणार आहे. 

राजचे वडील अनिरुद्धच हे षडयंत्र रचत असून भाऊ सुदर्शनला हाताशी घेऊन हा प्लॅन आखलेला असतो. पण हे सगळं अनिरुद्ध का करतोय आणि त्यानंतर अनिरुद्ध राजचं काय होईल हे कळणार आहे. वडिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्याच्या नादात राज आणि रत्नमालाच्या नात्यात दुरावा आला होता. अनिरुद्धचा प्लान इतका शातीर आहे की तो कुणाला काहीही कळू देत नाही. 

आजच्या भागात कावेरीच्या हाती नवा पुरावा येणार आहे. त्यामुळे राजला सूत्रधाराचं नाव कळणार आहे. आई आणि मुलामधलं अंतर कमी होतंय खरं... पण वडिलांच काय? त्यांचा प्लान कोन आणि कसा उद्धवस्त करणार? लवकरच या खेळाला कोण आणि कसा ब्रेक लावणार यासाठी भाग्य दिले तू मला महारविवार १७ डिसेंबर दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर पाहावे लागेल.

Web Title: New twist in 'Bhagya Dile Tu Mala' series; Sweetness in Ratnamala and Rajvardhan's relationship