'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, आशुतोषनं व्यक्त केल्या अरुंधतीसमोर त्याच्या मनातल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:32 IST2022-05-02T12:31:49+5:302022-05-02T12:32:26+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका रंजक वळणावर आली आहे.

New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Ashutosh expresses his feelings in front of Arundhati | 'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, आशुतोषनं व्यक्त केल्या अरुंधतीसमोर त्याच्या मनातल्या भावना

'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, आशुतोषनं व्यक्त केल्या अरुंधतीसमोर त्याच्या मनातल्या भावना

स्टार प्रवाह(Star Pravah)वरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. एकीकडे अनिरुद्ध संजनाच्या वर्तणुकीला कंटाळून तिला घटस्फोट देतो आहे. तर दुसरीकडे आशुतोष आणि अरुंधती यांच्यातील मैत्री फुलताना दिसत आहे. दरम्यान आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. तब्बल २६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशुतोष अरुंधतीसमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहे.

आई कुठे काय करतेचा नवा प्रोमो समोर आला आहे, त्यात पाहायला मिळत आहे की, अरुंधती आणि आशुतोष कुठेतरी गार्डनमध्ये दिसत आहे. त्यावेळी अरुंधती म्हणते खरंच आनंदात जगायचं. आयुष्य किती सुंदर आहे आणि त्या आनंदाने जगण्यासाठी आपण या आयुष्यात आलो. त्यानंतर आशुतोष बोलतो अरुंधती आय लव्ह यू. मरण कधीही येऊ शकतं कधीही. माझ्या मनात जे तुझ्याबद्दल आहे ते तुला न सांगता जर मी मरून गेलो असतो तर ते चुकीचे झाले असते. अखेर २६ वर्षानंतर आशुतोषने अरुंधतीसमोर आपल्या भावना सांगितल्या आहेत.


दरम्यान, आशुतोषचं हे बोलणे ऐकल्यानंतर आता अरुंधती कशी रिअॅक्ट करेल, किंवा ती त्यांना काय बोलेल हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. लवकरच मालिकेत आशुतोष आणि अरुंधतीचे लग्न पाहायला मिळणार आहे. कारण आई कुठे काय करते ही मालिका हिंदी मालिका अनुपमाचा रिमेक आहे. त्या मालिकेत अनुज आणि अनुपमाचे नुकतेच लग्न झाले आहे. 

Web Title: New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Ashutosh expresses his feelings in front of Arundhati