'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, जयदीप गौरीला सो़डून मानसीशी संसार थाटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:47 IST2022-05-11T17:46:25+5:302022-05-11T18:47:30+5:30

सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतोय. यात महिला मंडळातील काही बायका शिर्केपाटलांच्या घरावर मोर्चा घेऊन आलेल्या दिसतायेत.

New twisst will come Sukh mhanje nkki kay asat serial | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, जयदीप गौरीला सो़डून मानसीशी संसार थाटणार?

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, जयदीप गौरीला सो़डून मानसीशी संसार थाटणार?

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. शालिनीचे डावपेच एकीकडे सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. आता गौरी आणि जयदीपसमोर नवं सकंट उभं राहणार आहे. महिला मंडळाने शिर्केपाटलांच्या घरावर मोर्चा आणला आहे,

सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतोय. यात महिला मंडळातील काही बायका शिर्केपाटलांच्या घरावर मोर्चा घेऊन आलेल्या दिसतायेत. आणि शिर्के पाटलांचा धिक्कार असो अशी घोषणा बाजी करतायेत. शिर्के पाटलांनी मानसीवर केलेला अनन्या दूर करा आणि तिला तिचा हक्क मिळवून द्या अशी मागणी करतायेत. तसं केल्यास माईंच्या प्रतिमेचं दहन करण्याची धमकी देतात.

माईंच्या पुतळा दहन केल्याची धमकी महिला मंडळाच्या बायका देताच. जयदीप त्यांना थांबवतो आणि आपण मानसीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचं सांगतो हे ऐकताच गौरी आणि माईंना धक्का बसतो. शिर्के पाटलांची अब्रू वाचवी म्हणून खरंच जयदीप मानसीशी लग्न करणार का?, की मानसीसोबत लग्नाला होकार देणार जयदीप नसून अनिल आहे?, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील. 
 

Web Title: New twisst will come Sukh mhanje nkki kay asat serial