शनिदेवावर नवी मालिका 'जय जय शनिदेव' लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:36 IST2024-04-04T16:35:49+5:302024-04-04T16:36:14+5:30

Jai Jai Shani Dev : सोनी मराठी वाहिनीने नुकतीच नव्या मालिकेची घोषणा केली आहे. 'जय जय शनिदेव' असे या मालिकेचे नाव आहे.

New serial on Shani Dev 'Jai Jai Shani Dev' coming soon | शनिदेवावर नवी मालिका 'जय जय शनिदेव' लवकरच

शनिदेवावर नवी मालिका 'जय जय शनिदेव' लवकरच

सोनी मराठी वाहिनीने नुकतीच नव्या मालिकेची घोषणा केली आहे. 'जय जय शनिदेव' ( Jai Jai Shani Dev) असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. या मालिकेत काय पाहायला मिळेल आणि मालिकेचे स्वरूप कसे असेल, हे अजून गुलदस्त्यात आहे. 

'जय जय शनिदेव' मालिकेतील कलाकार अजून समजले नसले तरी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यावर मिळालेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे. शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. 

शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. लवकरच तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. मालिकेत कोण कलाकार असतील, मालिकेचा सारांश काय असेल; हे पुढे समजेलच. त्यासाठी सोनी मराठी पाहत राहा. मालिकेबद्दलची पुढील माहिती सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होईल.
 

Web Title: New serial on Shani Dev 'Jai Jai Shani Dev' coming soon