'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात होणार नव्या व्यक्तीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 12:45 IST2021-10-22T12:44:43+5:302021-10-22T12:45:06+5:30

घटस्फोट झाल्यानंतर आता अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

A new person will enter Arundhati's life in the series 'Aai Kuthe Kay Karte' | 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात होणार नव्या व्यक्तीची एन्ट्री

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात होणार नव्या व्यक्तीची एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका ‘आई कुठे काय करते’ला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते आहे. या मालिकेचे कथानक आणि या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. आता मालिकेत लवकरच एक नवीन वळण येणार आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

अभिनेता समीर धर्माधिकारीची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. समीर या मालिकेत अरुंधतीचा मित्र म्हणून दिसणार आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एन्ट्री करणार आहे. त्यासोबतच मालिकेत नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मित्राच्या येण्याने आता अरुंधतीच्या आयुष्यात काय काय बदल होणार आहे आणि देशमुखांच्या घरात काय घडमार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

देशमुखांच्या घरात होतो मोठा हंगामा
अनिरुद्धचा छोटा भाऊ अविनाश सध्या एका मोठ्या अडचणीत अडकला होता. त्याच्यावर काही लाखांचे कर्ज झाल्यामुळे तो चिंतेत होता. त्याला मदत म्हणून अरुंधतीने काही पैसे देऊ केले आहेत. याबद्दल घरात यश शिवाय कुणालाच कल्पना नाही.  हीच कल्पना यश गौरीला देत असताना संजनाच्या कानी पडते. त्यानंतर संजना देशमुखांच्या घरात येऊन पुन्हा एकदा मोठा हंगामा करते. यावरून पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात वादंग माजणार आहेत. खरेतर अरुंधतीने अप्पांनी तिच्या नावे केलेला घराचा अर्धा हिस्सा तारण म्हणून ठेवून जवळपास २५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन ते अविनाशला दिले होते. ही गोष्ट घरातील लोकांना कळताच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. तर, याबदल्यात आता संजनाने देखील उर्वरित घर विक म्हणून अनिरुद्धच्या मागे तगादा लावला आहे.

Web Title: A new person will enter Arundhati's life in the series 'Aai Kuthe Kay Karte'