'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या घरी आला नवा मेंबर, त्याच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 18:43 IST2019-09-03T18:43:27+5:302019-09-03T18:43:47+5:30

कुशल बद्रिकेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून सर्वजण त्याचं अभिनंदन करत आहेत.

New member in Chala Hawa Yeun Dya Fame Kushal Badrike's house | 'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या घरी आला नवा मेंबर, त्याच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या घरी आला नवा मेंबर, त्याच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील कॉमेडीयन रसिकांचे मनोरंजन करत आहेत. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचे कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. 

कुशल सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या कुटुंबातील लोक दिसत आहे. हा फोटो शेअर करून कुशलनं म्हटलं की, कधी कधी आनंद चार चाकांवरून धावत येतं. आनंदी कुटूंब.


कुशलने नुकतीच नवीन फोर व्हिलर घेतली असून त्याच्या घरच्या बाप्पाचं आगमनही नव्या कारमधून केलं आहे. त्याने या बाप्पाच्या आगमनाचाही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या घरी आलेल्या नव्या मेंबरसाठी सर्वजण त्याचे अभिनंदन करत आहेत. 


कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या या शोमधून खूप लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर त्याचे खूप फॉलोवर्स आहेत. 

Web Title: New member in Chala Hawa Yeun Dya Fame Kushal Badrike's house