‘बायको अशी हव्वी’ ही नवी मालिका येणार, मग कोणती जुनी मालिका बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 13:34 IST2021-03-26T13:33:24+5:302021-03-26T13:34:50+5:30

एखाद्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला रे झाला की, आता कोणती मालिका बंद होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

new marathi serial bayko ashi hawi coming soon chandra aahe sakshila going off air next month | ‘बायको अशी हव्वी’ ही नवी मालिका येणार, मग कोणती जुनी मालिका बंद होणार?

‘बायको अशी हव्वी’ ही नवी मालिका येणार, मग कोणती जुनी मालिका बंद होणार?

ठळक मुद्दे‘बायको अशी हव्वी’  या मालिकेत जान्हवी ही गृहीणी आणि तिचा पति विभास दाखवण्यात आला आहे.

एखाद्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला रे झाला की, आता कोणती मालिका बंद होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. सध्या असाच एक प्रश्न कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना पडला आहे. कारण आहे, ‘बायको अशी हव्वी’ या नव्या मालिकेचा प्रोमो.
होय, कलर्स मराठीवर ‘बायको अशी हव्वी’ ही नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्थात कधी व कोणत्या वेळेत, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्याचप्रमाणे कलर्स मराठीवरील कोणती मालिका बंद होऊन त्याजागी ही नवी मालिका येणार, हेही गुलदस्त्यात आहे. 

‘बायको अशी हव्वी’  या मालिकेत जान्हवी ही गृहीणी आणि तिचा पति विभास दाखवण्यात आला आहे. बायकांनी फक्त घरची कामं करावीत, करियर करु नये अशा विचारांचा  विभास आहे. या मालिकेत अभिनेता विकास पाटील विभासची भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री गौरी देशपांडे जान्हवीची भूमिका साकारतेय.   

ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

तर आता मोठ्ठा प्रश्न... ‘बायको अशी हव्वी’ मालिका येणार म्हटल्यावर, कोणती मालिका निरोप घेणार? तर ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळते. टीआरपी चार्टमध्ये फार समाधानकारक कामगिरी नसल्यामुळे पुढच्या महिन्यात ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका गुंडाळण्यात येणार असल्याचे कळतेय. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.  
 

Web Title: new marathi serial bayko ashi hawi coming soon chandra aahe sakshila going off air next month