Kapil Sharma's Income : एक तास हसवण्यासाठी इतकी रक्कम घेतो कपिल शर्मा, अक्षय कुमारलाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 15:15 IST2020-01-29T15:14:11+5:302020-01-29T15:15:41+5:30

Kapil Sharma's Earning : प्रॉपर्टीच्या बाबतीत कपिल कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही

net worth of comedian kapil sharma | Kapil Sharma's Income : एक तास हसवण्यासाठी इतकी रक्कम घेतो कपिल शर्मा, अक्षय कुमारलाही बसेल धक्का

Kapil Sharma's Income : एक तास हसवण्यासाठी इतकी रक्कम घेतो कपिल शर्मा, अक्षय कुमारलाही बसेल धक्का

ठळक मुद्देकपिल ज्या घरात राहतो, त्याची किंमत 8 कोटी रूपये आहे.

अक्षय कुमार कपिल शर्मा शोमध्ये आला रे आला की, त्याच्या कमाईचा मुद्दा निघतोच. अक्षय दरवर्षी 10-10 सिनेमे करतो,  सर्वाधिक इन्कम टॅक्स भरतो, अशा काय काय बोलून कपिल शर्मा अक्षयला डिवचतो. पण स्वत:च्या कमाईबद्दल मात्र बोलायचे टाळतो.  आज आम्ही तुम्हाला कपिलच्या कमाईबद्दल सांगणार आहोत. होय, कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडसाठी कपिल किती रक्कम घेतो, हे ऐकून तुम्हालाच नाही तर अक्कीलाही धक्का बसेल.


जाणून आश्चर्य वटोल की, कपिल शर्मा एका एपिसोडसाठी सोनीकडून सुमारे 80 ते 90 लाख रूपये वसूल करतो. म्हणजे एक तास हसवण्यासाठी तो 80 ते 90 लाख रूपये घेतो. याशिवाय कपिल सोलो व प्रायव्हेट परफॉर्मन्सही देतो. यासाठीही तो सुमारे 80 लाख रूपये फी घेतो. अनेक ब्रँडचा तो अ‍ॅम्बिसीडर आहे. कुठल्याही कंपनीचा चेहरा बनण्यासाठी कपिल 1 कोटी रूपयांपर्यंत चार्ज करतो. सध्या तो ओएलएक्स, हॉन्डा, पॉलिसी बाजार अशा अनेक ब्रँडशी जुळलेला आहे. 


कपिल ज्या घरात राहतो, त्याची किंमत 8 कोटी रूपये आहे. कपिलला महागड्या गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे Volvo XC 90, Mercedes Benz S Class सारख्या महागड्या गाड्या आहेत. या कारची किंमत 1 कोटींपेक्षा अधिक आहे. एकंदर काय तर प्रॉपर्टीच्या बाबतीत कपिल कुठल्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही.

Web Title: net worth of comedian kapil sharma